Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले ‘हे’ सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले फ्लॉप

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले ‘हे’ सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले फ्लॉप

वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वांच्या आवडीचा सण म्हणून दिवाळी साजरी होते. अंधारातून उजेडाकडे नेणारा हा सण म्हणजे सर्वच गोष्टींची लयलूट असते. कपड्यांपासून खाण्यापर्यंतचे लाड पुरवून घेण्यासाठी या सणाची आतुरतेने वाट बघतात. बॉलिवूडमध्ये देखील दिवाळी सणाची एक वेगळीच मजा पाहायला मिळते. या सणाच्या निमित्ताने अनेक मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक त्यांचे सिनेमे प्रदर्शित करत असतात. दिवाळीचा मुहूर्त साधत अनेक सुट्ट्या येतात त्यामुळे प्रेक्षक साहजिक चित्रपटगृहांकडे वळतात आणि कुटुंबासोबत चित्रपटाचा आनंद घेतात. दिवाळीच्या या मोठ्या सुट्टीनंच फायदा चित्रपटाला करून घेण्यासाठी अनेक मोठे सिनेमे दिवाळीत प्रदर्शित केले जातात. मात्र दिवाळीचा मोठा सण, मोठा सिनेमा, मोठ्या कलाकारांची फौज आदी अनेक चांगले मुद्दे असूनही काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटतात. आज या लेखातून जाणून घेऊया अशाच काही दिवाळीत प्रदर्शित झालेल्या मोठ्या फ्लॉप सिनेमांबद्दल.

ठग्स ऑफ हिंदोस्तान :
आमिर खानचा मोठा सिनेमा असणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला. मात्र हा त्यावर्षीचा सुपरफ्लॉप सिनेमा ठरला. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन दिग्ग्ज आणि मोठे काळकर देखील या चित्रपटाला वाचवू शकले नाही.

मिशन कश्मीर :
संजय दत्त, ऋतिक रोशन, प्रीति जिंटा यांचा २००० साली आलेला ‘मिशन कश्मीर’ चित्रपट देखील दिवाळीमध्ये रिलीज करण्यात आला होता. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित या सिनेमाचे बजेट दखल मोठे होते. सिनेमाची गाणीसुद्धा खूप गाजली पण सिनेमा फ्लॉप झाला.

सांवरिया :
संजय लीला भन्साळी यांचा २००७ साली सांवरिया हा ड्रीम प्रोजेक्ट असणारा सिनेमा प्रदर्शित झाला. रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांचा पहिला सिनेमा असणाऱ्या या चित्रपटातील गाण्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली, मात्र प्रेक्षकांना तो चित्रपटगृहांपर्यंत आणण्यास असफल ठरला.

मैं और मिसेस खन्ना :
सलमान खान, करीना कपूर आणि सोहेल खान यांचा मैं और मिसेस खन्ना हा सिनेमा प्रदर्शित झाला. २००८ साली दिवाळीत आलेला प्रेम राज यांचा हा चित्रपट तर पहिल्याच दिवशी फ्लॉप ठरला.

ऍक्शन रिप्ले :
अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, नेहा धुपिया, आदित्य रॉय कपूर आदी मोठ्या कलाकारांचा हा सिनेमा २०१० साली दिवाळीत रिलीज झाला होता. ऍक्शन, ड्रामा, कॉमेडी सर्व असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर; तेजश्री प्रधानचा दिवाळी लूक पाहून चाहतेही फिदा

-‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

हे देखील वाचा