Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड कोण आहे आर्यन खान? वाचा ‘किंग खान’च्या मुलाबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी! मार्शल आर्ट्सचं घेतलंय शिक्षण

कोण आहे आर्यन खान? वाचा ‘किंग खान’च्या मुलाबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी! मार्शल आर्ट्सचं घेतलंय शिक्षण

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या खूप चर्चेत आहे. शनिवारी (२ ऑक्टोबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपमधील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. या क्रूझ शिपमध्ये एनसीबी टीम प्रवासी म्हणून आली होती आणि त्यांनी पार्टीवर छापा टाकला. या पार्टीत बॉलिवूड, फॅशन आणि व्यावसायिक लोक उपस्थित होते. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुखचा मुलगा आर्यन खानही या कारवाईत अडकला आहे. आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट व मूनमून धमेचाला अटक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. अशा परिस्थितीत शाहरुखच्या चाहत्यांना आर्यनबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. शाहरुख खानचा मुलगा लाईमलाईटपासून का दूर राहतो याबद्दल जाणून घेऊया.

आर्यन खानचा जन्म १३ नोव्हेंबर, १९९७ रोजी दिल्लीत झाला. त्याने लंडनच्या सेव्हन ओक्स स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. आर्यन हा शाहरुख खानचा मोठा मुलगा आहे. मात्र, इतर स्टार किड्सप्रमाणे आर्यन स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. तो माध्यमांशी क्वचितच संवाद साधतो. एवढेच नाही, तर आर्यन सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय आहे. हे सर्व असून देखील तो चर्चेत राहतो.

आर्यनने अलीकडेच युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियामधून आपली पदवी पूर्ण केली आहे. त्याने चित्रपट अभ्यासात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे आर्यनने टेक्वान्डो मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही घेतले आहे. त्यात त्याला ब्लॅक बेल्टही मिळाला आहे. यापूर्वी, आर्यनचे ग्रॅज्युएशन डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचबरोबर त्याची बहीण सुहाना खान देखील न्यूयॉर्क विद्यापीठातून हाच अभ्यासक्रम करत आहे. आर्यन खानबद्दल डेव्हिड लेटरमॅनसोबतच्या एका शोमध्ये शाहरुख खानने स्पष्टपणे सांगितले होते की, त्याला कलाकार व्हायचे नाही.

आर्यन खानच्या चर्चेचा संदर्भ देत शाहरुख म्हणाला होता की, “माझ्यासोबत त्याची तुलना केली जाईल. त्याची आवड दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आहे, तर सुहानाला अभिनयात करिअर करायचे आहे.

आर्यन खान चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसला आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात त्याने वडील शाहरुख खानचे बालपणीचे पात्र साकारले होते.”

या व्यतिरिक्त, आर्यन खानने २०१९ मध्ये डिस्नेच्या ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या हिंदी वर्जन ‘सिम्बा’ चित्रपटाला आवाज दिला, तर शाहरुखने ‘मुफासा’ हिंदीत डब केला होता. आर्यन खानचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नावेदी नंदाशी जोडले गेले होते. मीडियामध्ये अशा अनेक बातम्या आल्या आहेत की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याची अधिकृतपणे कधीही पुष्टी झाली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने दिली एक दिवसाची एनसीबी कस्टडी

-क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

-‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा

हे देखील वाचा