Wednesday, July 3, 2024

ज्याचं होतं, त्यालाच कळतं; अभिनेत्री दिव्यांकाने सांगितलं ब्रेकअपचं दुःख, नंतर ‘अशी’ झालेली हालत

दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आज प्रत्येक घराघरात एक प्रसिद्ध नाव आहे. दिव्यांका तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिला टीव्ही सीरियल ‘बनू मैं तेरी दुल्हन’मधून प्रसिद्धी मिळाली. या टीव्ही मालिकेत दिव्यांकाचा सहकलाकार शरद मल्होत्रासोबतच्या (Sharad Malhotra) तिच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळ बऱ्याच रंगल्या होत्या. बातम्यांनुसार, हे दोन्ही कलाकार बऱ्याच काळापासून खूप गंभीर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

बातमीनुसार, शरदसोबतच्या ब्रेकअपने दिव्यांका त्रिपाठीला पूर्णपणे तोडले होते. या ब्रेकअपबद्दल बोलताना दिव्यांका स्वतः एका मुलाखतीत म्हणाली होती की, “तो खूप कठीण काळ होता, मी आतून रडायची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी बाहेर कोणालाही सांगू शकले नाही, खासकरून शूटिंगदरम्यान. मी माझ्या भावनांवर खूप नियंत्रण ठेवले. पण मी रडायचे.” (know what divyanka tripathi learnt after her break up with sharad malhotra)

बातमीनुसार, शरदसोबतच्या ब्रेकअपने दिव्यांका त्रिपाठीला पूर्णपणे तोडले होते. या ब्रेकअपबद्दल बोलताना दिव्यांका स्वतः एका मुलाखतीत म्हणाली होती की, “तो खूप कठीण काळ होता, मी आतून रडायची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी बाहेर कोणालाही सांगू शकले नाही, खासकरून शूटिंगदरम्यान मी माझ्या भावनांवर खूप नियंत्रण ठेवायचे, पण शेवटी मी रडायचे.”

दिव्यांका पुढे म्हणते, “माझ्या आत वादळ चालू होतं. मी आजारी पडले होते. अगदी मला फूड पॉयझनिंगचा त्रासही झाला होता. तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं आहे, हे समजायला लागलं होतं.”

दिव्यांका त्रिपाठी म्हणते की, “यानंतर माझे फ्रॅक्चर झाले आणि सर्व नकारात्मकता जाऊ लागली राहिली.” हे कसे घडले याचे कारण सांगताना दिव्यांका म्हणते, “मी माझ्या फ्रॅक्चरला सामोरे जात होते, व्यावसायिक वचनबद्धतेची पूर्तता करत होते आणि एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळत होते. तेव्हा मला एक गोष्ट समजली की, जर मी या सगळ्या गोष्टी एकटी हाताळू शकते, तर मग ब्रेकअप काय चीज आहे?”

तसेच, दिव्यांकाने अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले आहे. या दोघांची भेट ‘ये है मोहोब्बते’च्या सेटवर झाली होती. आता दिव्यांका आपला भूतकाळ विसरून पूढे वाटचाल करत आहे. तसेच आपल्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा