Friday, March 29, 2024

आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

मागील अनेक दिवसांपासून आर्यन खान अं’मली पदार्थ केस सर्वत्र गाजत होती. बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानच्या कुळाचे या केसमध्ये नाव आल्याने याला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले. २ ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई करत आर्यनला अटक केली. त्यानंतर तब्बल २५ दिवसांनी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) आर्यनला जामीन मिळाला. शाहरुखचा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे कोर्टाचा हा आदेश शाहरुखसाठी त्याच्या वाढदिवसाचे ऍडव्हान्स बर्थडे गिफ्ट मानले जात आहे. आता शाहरुख आपला वाढदिवस मुलगा आर्यनसोबत साजरा करू शकणार आहे. २३ वर्षीय आर्यन खानला एनसीबीने मुंबईतील क्रुझवरुन अटक केली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ माजली. आर्यनसोबतच त्याचा मित्र असलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या दोघांना देखील एनसीबीने ताब्यात घेतले.

या अटकेनंतर त्यांना तिघांनाही कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांचा जामीन नाकारत त्यांना एनसीबी कोठडीतच राहण्याचेच आदेश दिले. त्यानंतर ७ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा एनसीबीला मोठा धक्का बसला. कोर्टाने या निर्णयात आर्यन आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आर्यनला यासर्वातून बाहेर काढण्यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मोठे प्रयत्न केले. मात्र एनसीबीकडून आर्यनने अं’मली पदार्थ स्वतःजवळ ठेवले नसले, तरी तो मागील काही वर्षांपासून त्याचे सेवन सेवन करत असल्याचे आणि त्याच्या फोनमध्ये मिळालेल्या चॅटनुसार त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अं’मली पदार्थांशी संबंध असल्याचे सतत कोर्टात सांगितले गेले.

यादरम्यान आर्यनला अनेकदा कोर्टात हजर करण्यात आले, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. पण त्याला जामीन मिळत नव्हता. म्हणून शाहरुख खानने अमित देसाई या वकिलांची देखील या केसमध्ये नियुक्ती केली. आता ही केस सतीश मानशिंदे आणि अमित देसाई दोघे मिळवून बघत होते, तरीही त्यांना आर्यनला जामीन मिळवून देण्यास यश मिळत नव्हते. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील आणि राजकारणातील अनेक लोकांनी शाहरुख खानला पाठिंबा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. यामध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकारांचा देखील समावेश होता. यातच एनसीबीकडून शाहरुख खानच्या बंगल्यावर रेड देखील मारण्यात आली. या प्रकरणाची चौकशी होत असताना यात अभिनेत्री अनन्या पांडेचेही नाव आली आणि तिची देखील चौकशी झाली. यात अनन्याने आर्यनला अंमली पदार्थ दिल्याचे कबूल केले.

यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आणि एनसीबीचे मुख्य अधिकारी असलेल्या समीर वानखेडेंच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘समीर वानखेडे हे परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या सारखेच अधिकारी आहेत,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला. कलाकारांकडून त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला. शाहरुख खानने वानखेडे यांनी ८ कोटींची खंडणी मागितल्याचे देखील सांगण्यात आले. आर्यन खान प्रकरण एकीकडे सुरू असताना दुसरीकडे समीर वानखेडेंवर विविध आरोप केले जात होते.

पुढे शाहरुखने सतीश मानशिंदे आणि अमित देसाई यांच्यासोबत मुकुल रोहितगी या अजून एका मोठ्या वकिलाची या केसमध्ये एन्ट्री केली. यातच एक दिवस शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये देखील पोहचला होता. आज आर्यनला जो जामीन मिळाला त्याची सुनावणी मागील तीन दिवसांपासून सुरू होती. आज त्याला जामीन मिळेल की पुन्हा एकदा त्याच्या पदरी निराशा पडेल असा विचार सर्व जणं करत असतानाच आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी आली, आणि शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. गुरुवारी २८ ऑक्टोबरला जरी आर्यनला जामीन मिळाला असला, तरी त्याला बाहेर येण्यासाठी २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागू शकते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

हे देखील वाचा