Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड काय सांगता! माधुरीपासून ते ऐश्वर्यापर्यंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी घेतले होते अभिनेत्यापेक्षाही अधिक मानधन

काय सांगता! माधुरीपासून ते ऐश्वर्यापर्यंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी घेतले होते अभिनेत्यापेक्षाही अधिक मानधन

जेव्हा एखादा कलाकार चित्रपट साईन करतो, त्यानंतर त्या नव्या सिनेमासोबतच, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, सिनेमाची कथा, प्रदर्शन आदी विषयांवर चर्चा नक्कीच होतात. मात्र, यासोबतच सर्वात जास्त चर्चा होते ती चित्रपटाचे बजेट आणि कलाकारांची फी. सिनेमात जितके मोठा कलाकार तितकी त्यांच्या मानधनासंदर्भात चर्चा होते. यातही चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री यांना दिलेल्या फीवरून तर चर्चासत्र देखील रंगले जातात. हिरो आणि हिरोईन यांना मिळणारी फी हा तर अनेकदा वादाचा मुद्दा देखील ठरला आहे. एकाच सिनेमात अभिनेत्याला अभिनेत्रींपेक्षा कमी फी दिली तर यावरून सोशल मीडियावर जी चर्चा रंगते ती बघण्यासारखी असते.

बॉलिवूडमध्ये असे अनेकवेळा झाले आहे की, मुख्य अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीला जास्त मानधन देण्यात आले. आज या लेखात आपण अशाच काही जोड्या आणि चित्रपटांची नावे जाणून घेणार आहोत, ज्यात असा मानधनाचा फरक होता.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांची जोडी ओळखली जाते. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांनी जवळपास ९ चित्रपटांमध्ये काम केले. एका कार्यक्रमादरम्यान अभिषेकने सांगितले होते की, अनेक सिनेमांमध्ये त्याला ऐश्वर्यापेक्षा कमी पैसे दिले गेले आहेत. ऐश्वर्याला नेहमीच जास्त पैसे मिळायचे.

दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन
दीपिकाचा सिनेमा म्हटल्यावर नेहमीच प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्याही सिनेमाकडून भरपूर अपेक्षा असतात. तिचा अभिनय, तिचे सौंदर्य, तिची अदा आदी अनेक गोष्टी प्रेक्षकांवर भुरळ घालतात. दीपिका आणि अमिताभ यांनी ‘पिकू’ या सिनेमात सोबत काम केले. या चित्रपटासाठी दिपीकाला अमिताभपेक्षा अधिक पैसे दिले गेले होते. अमिताभ यांनी ‘पिंक’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी हा खुलासा केला होता.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण
ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणूनच ओळखली जाते, ‘रील’ आणि ‘रिअल’ अशा दोन्ही जीवनात यशस्वी असणाऱ्या या जोडीने अनेक सिनेमे केले आहेत. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार ‘पद्मावत’ सिनेमासाठी दीपिकाला रणवीरपेक्षा आणि शाहिदपेक्षा अधिक पैसे मिळाले आहेत.

कंगना रानौत आणि इम्रान खान
या दोघांनी ‘कट्टी बट्टी’ नावाचा सिनेमा एकत्र केला आहे. या सिनेमासाठी इम्रानपेक्षा अधिक पैसे कंगनाला मिळाले आहेत.

माधुरी दीक्षित आणि सलमान खान
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात जास्त लोकप्रिय आणि चर्चेत असणारी जोडी म्हणजे सलमान खान आणि माधुरी दीक्षित. या दोघांनी देखील काही सिनेमेसोबत केले. मात्र, त्यांचा ‘हम आपके हैं कौन?’ सिनेमा तुफान गाजला. या सिनेमासाठी माधुरीला सलमानपेक्षा अधिक मानधन मिळाले होते. याची माहिती अनुपम खेर यांनी एकदा ट्वीट करून दिली होती.

करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर आणि सैफ अली खान ही खऱ्या आयुष्यातील हिट जोडी पडद्यावरसुद्धा हिट ठरली. एका रिपोर्टनुसार यादोघांचा ‘कुर्बान’ हा सिनेमा आल्यानंतर मिळालेल्या बातमीनुसार करीनाला सिनेमासाठी सैफपेक्षा जास्त मानधन मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा