अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडेने तिच्या पतीवर मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. एवढंच नाही, तर पूनम जखमी आहे आणि तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तिचे डोके, डोळे आणि तोंडावर जखम झाली आहे. पोलिस याबाबत तपासणी करत आहे. परंतु ही काही पहिली वेळ नाहीये जेव्हा पूनमने तिच्या पतीवर आरोप केले आहेत. या आधी देखील तिच्या पतीने जेलची हवा खाल्ली आहे. चला तर जाणून घेऊया सॅम बॉम्बे नक्की कोण आहे?
सॅम बॉम्बेचा जन्म दुबईमध्ये झाला. ३७ वर्षीय सॅमचे पूर्ण नाव सॅम अहमद बॉम्बे हे आहे. पूनम आधी सॅमचे लग्न ऍले अहमदसोबत झाले होते. जी एक मॉडेल आहे. दोघांना दोन मुलं देखील आहे. सॅम हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तसेच तो अनेक ऍड फिल्मचा दिग्दर्शक देखील आहे. त्याने दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, अक्षय कुमार, रणबीर कपूर तमन्ना भाटिया यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. (Know who is poonam pandey husband Sam Bombay who was again accused a assault)
पूनमने आणि सॅमने अडीच वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर १० सप्टेंबर २०२० रोजी दोघांनी सिक्रेट वेडिंग केले. लग्नानंतर काही दिवसांनी ते गोव्याला फिरायला गेले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.
पूनम पांडेच्या लग्नानंतर १३ दिवसांनी त्यांच्यात खूप भांडण झाली. यामुळे तिच्या पतीला जेलमध्ये जावे लागले होते. तिने सॅमवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी तिच्या पतीला अटक केले होते. त्याच्यावर ३५३, ५०६ आणि ३५४ हे कलम लावले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-