Saturday, July 6, 2024

निर्मात्यांशी भांडण नाही, पण ‘या’ कारणामुळे सौम्या टंडनने सोडली ‘भाभी जी घर पर हैं’ मालिका

‘भाभी जी घर पर हैं’ ही कॉमेडी टीव्ही मालिका २०१५ पासून प्रसारित होत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. जिथे या मालिकेने अनेक चढउतारही पाहिले आहेत. नुकतीच ही टीव्ही मालिका तिच्या नव्या ‘अनिता भाभी’मुळे चर्चेत आली आहे. होय, माध्यमांतील वृत्तानुसार, निर्मात्यांनी अभिनेत्री नेहा पेंडसेला (Neha Pendse) या मालिकेतून बाहेर काढले आहे आणि तिच्या जागी टीव्ही अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवची (Vidisha Shriwastav) निवड करण्यात आली आहे. विदिशाने यापूर्वी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मात्र, नेहा आणि विदिशापूर्वी (Vidisha Shrivastava) अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) अनिताच्या भाभीची भूमिका साकारायची. सौम्या या कॉमेडी टीव्ही सीरियलशी सुरुवातीपासून जोडलेली होती आणि ‘अनिता भाभी’ किंवा ‘गोरी मेम’ ही व्यक्तिरेखा खर्‍या अर्थाने लोकप्रिय करण्याचे श्रेय तिला जाते. या मालिकेत अनिता ही विभूती नारायण मिश्रा म्हणजेच आसिफ शेख (Aasif Sheikh) यांची पत्नी असून ती एक सुशिक्षित, आधुनिक आणि स्वतंत्र महिला असल्याचे दाखवण्यात आले आहे.

याउलट तिचा नवरा विभूती बेरोजगार असल्यामुळे सर्व परिसर त्याला ‘नल्ला’ म्हणत चिडवतो. त्याचवेळी अनिता भाभींच्या शेजारी राहणारा मनमोहन तिवारी म्हणजेच अभिनेता रोहिताश्व गौर (Rohitashv Gaud) याने अनिताला प्रभावित करण्याचे प्रयत्न करताना दाखवला आहे.

मात्र, इतकी प्रचंड लोकप्रियता असूनही सौम्या टंडनने शो का सोडला? याचे उत्तर खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिले आहे. सौम्या टंडनच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षे एकच भूमिका करून तिला कंटाळा आला आणि याच कारणामुळे तिने मालिका सोडली. सौम्याने अचानक ही मालिका सोडल्यानंतर, निर्मात्यांसोबतच्या मतभेदामुळे तिने ही मालिका सोडल्याचाही अंदाज लावला जात होता.

सौम्या टंडनचं करिअर
सौम्या टंडनने २००६ मध्ये टीव्ही शो ‘ऐसा देश है मेरा’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये तिने रस्टी देओलची भूमिका साकारली. यानंतर तो ‘मेरी आवाज को मिल गई रोशनी’ मध्ये दिसली. त्यानंतर ती ‘जोर का झटका’ या रियॅलिटी शोमध्ये शाहरुख खानसोबत होस्ट म्हणून दिसली. याशिवाय, ती ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’, ‘मल्लिका-ई-किचन ऑन एअर’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ सारख्या सिरियल होस्ट करतानाही दिसली आहे. २००७ मध्ये, ‘जब वी मेट’ चित्रपटात तिने करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

हेही वाचा – 

हे देखील वाचा