Wednesday, July 3, 2024

दीपिका आणि कॅटरिनाबाबत आलियाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, ‘त्या दोघी मला…’

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (karan johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण’ सीझन ७ सुरू झाला आहे. चॅट शोच्या या नवीन सीझनचा पहिला भाग गुरुवारी संध्याकाळी डिस्नी हॉटस्टारवर प्रसारित झाला. अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) आणि आलिया भट्ट (alia bhatt) करणचे पहिले पाहुणे म्हणून आले होते. शोचा हा एपिसोड चांगलाच धमाकेदार होता. जिथे रणवीर सिंग आणि आलियाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टने पती रणबीर कपूरच्या माजी
गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि कॅटरिना कैफबद्दलही (katrina kaif) बोलली.

वास्तविक, चॅटमध्ये करण जोहरने आलिया भट्टला रॅपिड फायर दरम्यान एक प्रश्न विचारला होता. करणने आलियाला विचारले की तुम्हाला यापैकी कोणते विधान अधिक योग्य वाटते. त्यानंतर, पुढील पर्याय देत, करणने सांगितले की, एक्ससोबत मित्र कसे राहायचे किंवा त्याच्या जोडीदाराच्या एक्ससोबत कसे मित्र राहायचे. करणच्या या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणाली की, तिच्या जोडीदाराच्या एक्ससोबत मैत्री कशी करावी. आलियाने पुढे सांगितले की, “रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत माझी अजूनही चांगली मैत्री आहे, अभिनेत्रीने असेही सांगितले की ती त्या दोघींवर खूप प्रेम करते.”

आलिया भट्टसोबत लग्न करण्यापूर्वी रणबीर कपूरने दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफला डेट केले आहे. धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनीही कॉफी विथ करण चॅट शोमध्ये आपापल्या लव्ह लाईफचे अनेक रहस्य शेअर केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘…लंगोट म्हणून बांधलाय’, विशाखाच्या त्या प्रश्नावर पॅडीचं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून खदखदून हसाल

घटस्फोट होऊनही ‘ही’ अभिनेत्री झाली होती आई, सलमासोबत काम करण्यासाठी लपवली होती एवढी मोठी गोष्ट

साऱ्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् सूनबाईंच्या शुभेच्छा दुसरीकडं, आलियाने बनवला नीतूंचा वाढदिवस खास

हे देखील वाचा