Wednesday, July 3, 2024

क्रांती रेडकर झाली संशोधक! वजन कमी करण्यावर तिने शोधला प्रभावी उपाय, नेटकरी म्हणाले ‘डॉक्टरेट मिळणारच’

मनोरंजनविश्वात काम करत असताना अभिनेत्रींना नेहमीच त्याचे वजन एका प्रमाणात ठेवावे लागते. चित्रपटासाठी त्या वजन कमी जास्त करत असतात. मात्र त्यांना त्यांचे वजन नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवावे लागते. मात्र हा जागतिक प्रश्नच आहे की वजन कमीच होत नाही. कमी खाल्ले तरी वजन वाढते. वजन तर कमी करायचे असते, पण त्यासाठी कमी कष्ट पडावे अशीच सर्वांची इच्छा असते. त्यामुळे कलाकारांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच वजन कमी करण्याचा अतिशय सोपा मार्ग शोधतच असतात. अशातच आता अभिनेत्री क्रांती रेडकरने एकदम हटके मजेशीर आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. याचा एक खास व्हिडिओ तिने शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओची तुफान चर्चा आहे.

क्रांतीने तिचे वजन केवळ दीड आठवड्यात अडीच किलो कमी केले आहे. ते कशाप्रकारे याबद्दल तिने तिच्या फॅन्सला तिची सिक्रेट पद्धत देखील सांगितली आहे. ती म्हणते, “मी मागच्या दीड आठवड्यात माझे अडीच ते तीन किलो वजन कमी केले. आता तुम्ही म्हणाल कसे केले हे? याचे सिक्रेट काय? तर सिक्रेट काही नाही. सिक्रेट खूप सोपं आहे. उजव्या हाताला पांढऱ्या रंगाचं नेलपॉलिश लावायचे. त्यात जे जेल असते ते थोडं महाग असले तर मग तुम्ही हा उपाय करणारच…”


पुढे ती म्हणते, “एकतर आपण आहोत भारतीय. हाताने खायची सवय. त्यात तुम्ही जर मालवणी असाल तर मासे आणि भात. माशाची कढी कालवून खायची मस्त रेमटवून. ती तुम्हाला काट्या चमच्याने खावी लागणार आणि मग तुम्हाला त्याची चवच येणार नाही. तुम्ही काय करणार? कमी खाणार. माझे असेच झाले असल्यामुळे मी दीड आठवडे नीट जेवतच नाही आणि काट्या चमच्याने मला चवच येत नाही. तर हे जे पांढरे नेलपॉलिश आहे ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. किमान माझ्यासाठी तरी. नंतर माझे आभार माना.”

तिच्या या व्हिडिओवर आता नेटकरी एकापेक्षा एक अशा भन्नाट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, “डायटिशियन विचारताय जॉब सोडू का?”, एकाने लिहिले, “त्या काट्या चमच्याने जेवून माशांचा अपमान केला”. एकाने लिहिले, “नक्कीच डॉक्टरेट मिळणार” दरम्यान तिचा हा व्हिडिओ भरपूर गाजत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा