Wednesday, July 3, 2024

टायगर श्रॉफच्या बहिणीने केले महागड्या ड्रेसमध्ये स्टनिंग फोटोशूट, फोटोंवर भाळले नेटकरी

सोशल मीडियामुळे कलाकारांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही प्रकाशझोतात आणि आणि कालांतराने सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट होते. आज सोशल मीडियावर असे अनेक लोकं आहेत जे चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत नसूनही तुफान लोकप्रिय आहेत. कोणत्याही मोठ्या कलाकाराला मिळावी इतकी लोकप्रियता आणि प्रसिद्ध या लोकांना मिळते. सोशल मीडियामुळे कलाकारांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मग भलेही ते इंडस्ट्रीमध्ये नसतील तरी ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावरील सर्वात चर्चेत असणारा आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे कृष्णा श्रॉफ.

बॉलिवूडच्या लोकप्रिय जग्गू दादाची लेक असणारी कृष्णा श्रॉफ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत तिच्या अकाऊंटवरून तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही स्टनिंग फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये कृष्णा कमालीची आकर्षक दिसत आहे.

कृष्णाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ग्रे कलरच्या काऊचवर ग्रे कलरचाच ड्रेस घालून बसलेली दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिने काही बोल्ड पोज दिल्या आहेत. तिने तिच्या ड्रेससोबत मॅचिंग इयरिंग्स आणि सँडल्स घातले असून ते तिच्या लुकला अधिक लक्षवेधी करत आहेत. याशिवाय तिने तिच्या या लुकला पोनी टेल बांधून आणि हेव्ही कानातले घालून कम्प्लिट केले आहे. तिने हे फोटोशूट एका मासिकासाठी सिल्वर शेड स्नेक प्रिंटेड आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. या लूकमध्ये ती खूपच मादक दिसत आहे. एका रिपोर्टनुसार या ड्रेसची किंमत ५२ हजार रुपये आहे.

कृष्णा श्रॉफने तिचे हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “या लूकमधून बाहेर नाही पडू शकत.” तिच्या या लूकचे नेटकरी भरपूर कमेंट्स करत कौतुक करत आहे. कृष्णा बहुतकरून तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे बिकिनी फोटो नेहमीच तुफान व्हायरल होत असतात.

कृष्णा तुफान फिटनेस फिक्र आहे. ती नेहमीच तिच्या इंस्टग्रामवर तिचे व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. कृष्णाने एमएमए मॅट्रिक्स फिटनेस सेंटर आणि मॅट्रिक्स फाईट नाईटची फाऊंडर आहे. ती फिटनेसच्या बाबतीत तिच्या भावाला टायगर श्रॉफला देखील टक्कर देते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा