Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड ब्लॅक ब्यूटी! काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले कृष्णा श्रॉफचे सौंदर्य; फोटोशूटचा सोशल मीडियावर राडा

ब्लॅक ब्यूटी! काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले कृष्णा श्रॉफचे सौंदर्य; फोटोशूटचा सोशल मीडियावर राडा

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण न करता स्टारडम मिळवले आहे. पदार्पणाशिवाय लोकप्रियतेच्या बाबतीत ती बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. ती सतत तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. तिने नुकतेच आपले काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कृष्णा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर नुसता राडा केला आहे. तिच्या या फोटोंना हजारो चाहत्यांनी लाईक केले आहे. कृष्णा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. कृष्णाचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. ती कधी बोल्ड, तर कधी हॉट अवतारात दिसते.

कृष्णा आणि तिचा भाऊ टायगर श्रॉफसह मिक्स्ड मार्शल आर्ट्स स्टुडिओ आणि एमएमए मॅट्रिक्सची सह-मालक आहे. याशिवाय मुंबईत त्यांची स्वतःची जिम आहे. कृष्णा श्रॉफला बॉलिवूडमध्ये येण्यात रस नाही. ती एक मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. तिला गेम खेळायलाही आवडते.

कृष्णा आहे फिटनेस फ्रिक
कृष्णाने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. कृष्णा देखील तिचा भाऊ टायगरप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. कृष्णा तिच्या जिमिंग आणि वर्कआउटचे फोटो तसेच व्हिडिओही शेअर करते. त्याचबरोबर कृष्णा ही जिम चेनची ऑनरही आहे. काही काळापूर्वी ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती.

टायगर श्रॉफ शेवटचा ‘बागी ३’ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यात रितेश देशमुख, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

टायगर सध्या त्याच्या आगामी ‘हिरोपंती २’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध भूमिकेत अभिनेत्री तारा सुतारिया असणार आहे. अहमद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. टायगर अहमद खानच्या ‘बागी ४’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

हे देखील वाचा