हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टिवर्टने तिच्या गर्लफ्रेंड डायलन मेयरसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्री स्पेन्सरने सिरियसएक्सएमच्या द हॉवर्ड स्टर्न शोमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. या साखरपुड्यावर स्टिवर्ट म्हणाली, “आम्ही लग्न करत आहोत, आम्ही लग्न नक्कीच करणार आहोत. मला तिला प्रपोज करायचे होते. मी ते केले आणि तिने देखील हो म्हटले. आम्ही लग्न करत आहोत आणि हे सत्यात घडत आहे.”
स्टिवर्टने डायलन मेयरसोबत डेटिंग सुरु केल्यानंतर एका मुलाखतीमध्ये स्टिवर्टने डायलरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. २०१९मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली. डेटिंगच्या अवघ्या दोन आठवड्यातच स्टिवर्टने डायलरला तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. एक दिवस ते एका आलिशान बारमध्ये बसले होते. रात्री खूप उशीर झाला होता. तिचे मित्र निघून गेले होते. आम्ही दोघे बसलो असताना मी तिला म्हटले, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो आय लव्ह यू.”
पुढे स्टिवर्टने सांगितले, “आम्ही दोघेही लॉस ऍंजिलिसचे आहोत आणि आमचे आमच्या शहरावर खूप प्रेम आहे. आम्ही जेवढे एकसारखे आहोत तेवढे वेगळे देखील आहोत. डायर उत्तम लेखिका असून, ती खूप हुशार आहे. मी मेयरला सांगितले की, मी भविष्यात तुझ्याशी लग्न झाल्याचे पाहिले आहे. मी मेयरला प्रपोज करण्यासाठी वाट बघू शकत नाही आणि लवकरच तिच्याशी लग्न करेल.”
मागच्यावर्षी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिस्टनने सांगितले की, “माझ्या डोक्यात नेहमीच विचार यायचा की, आम्ही बाहेर गेलो तर जेव्हा आम्ही काही प्रेमाचे क्षण सोबत घालवू तेव्हा आमचे फोटो काढल्या जातील. मात्र मी यांबद्दल अधिक बोलू शकत नव्हती. माझ्यावर खूप दबाव होता. मात्र लेस्बियन समाजाने माझ्यावर कोणताच दबाव टाकला नाही.”
क्रिस्टन स्टिवर्ट आधी सुपरमॉडेल स्टेला मॅक्सवेल आणि रॉबर्ट पॅंटीसनला डेट केले आहे. बॅटमॅन स्टार आणि क्रिस्टन देखील सोबत होते. त्यांनी ट्वाइलाइट सिनेमाच्या दरम्यान एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-‘तडप’ सिनेमातील पहिले गाणे चाहत्यांच्या भेटीला, पाहायला मिळाली अहान अन् ताराची सिझलिंग केमिस्ट्री
-‘यादों की बारात’ चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण, सुपरस्टार राजेश खन्नांना टक्कर द्यायचा ‘हा’ अभिनेता










