Sunday, June 16, 2024

चित्रपट सृष्टीत कोरोनाचा वाढता प्रभाव, दोनच दिवसात चौथा कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

२०२० हे वर्ष सर्वांसाठीच खूप त्रासदायक ठरले. कोरोनासारख्या महामारीने यावर्षीच्या सुरवातीलाच आपल्या देशात प्रवेश केला आणि हळू हळू सर्वच क्षेत्रात कोरोना वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळेच सरकारने लॉकडाऊन करत शक्य तितके क्षेत्र बंद केले आणि काही ठिकाणी घरून काम करण्याची सोय करण्यात आली. मनोरंजन क्षेत्रावर देखील कोरोनाचा प्रभाव झाला आणि सर्व शूटिंग बंद झाल्या.

आता सुदैवाने अनलॉक झाले आणि सर्व शूटिंग पुन्हा सुरु झाल्या मात्र आता अनेक कलाकार कोरोना पॉसिटीव्ह होत आहेत. त्यात आता क्रिती सॅननला देखील कोरोना पॉसिटीव्ह निघाली असून याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली. क्रिती नुकतेच राजकुमार राव सोबत तिच्या आगामी सिनेमाचे चंदिगढ मधले चित्रीकरण संपून मुंबईत आली. तेव्हा तिचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आले आहेत.

याबद्दल क्रितीने तिच्या अकाऊंटवर लिहले ,” मी तुम्हा सर्वाना सांगू इच्छेते की, मी कोरोना पॉसिटीव्ह झाली आहे. बिलकुल चिंता करायची गोष्ट नाहीये कारण मी खूप छान आणि स्वस्थ आहे. मात्र मी माझ्या डॉक्टर आणि मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर स्वतःला क्वारंटाईन केले आहे. मी लवकरच बरी होऊन पुन्हा शूटिंगला परतणार आहे. मी आता तुम्ही दिलेल्या सर्व शुभेच्छा वाचत आहे. तुमच्या शुभेच्छा काम करत असून मी आता ठीक होत आहे. तुम्ही सर्वानी देखील खूप काळजी घ्या, सावध राहा कारण अजून कोरोनाची महामारी गेली नाहीये.”

 

क्रितीच्या या पोस्टवरून तिला अनेक कलाकारांनी शुभेच्छा देत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय तिच्या फॅन्सकडून देखील तिला अनेक शुभेच्छा येत आहे. क्रितीने हिरोपंती चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. याशिवाय क्रिती ‘दिलवाले’, ‘हाऊसफुल’ ४, ‘पानिपत’ या चित्रपटांमधून झळकली. क्रितीच्या आगामी सिनेमांमध्ये ‘बच्चन पांडे’, आणि ‘मिमी’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘मिमी’ हा सिनेमा मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचं’ याचा हिंदी रिमेक आहे.

हे देखील वाचा