Monday, July 8, 2024

दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडवर आहे क्रिती सेननची नजर? अभिनेत्रीने सर्वांसमोर जाहीर केली ‘ही’ इच्छा

बॉलिवूड कलाकार आपल्या वेगवेगळ्या व नवनवीन रिलेशनशिपमुळे कायमच चर्चेत असतात. चित्रपटांमध्ये एकमेकांबरोबर काम करत असताना एकमेकांच्या सानिध्यात राहून, त्यांचे आकर्षण वाढते आणि प्रेमसंबंध तयार होतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या विषयीच्या यासर्व गोष्टींची माहिती जाणून घ्यायला फार गंमत वाटते. अशात सध्या क्रिती सेनन देखील अशाच काही गोष्टींमुळे चांगलीच चर्चेत आहे.

क्रितीने नुकतेच एका रॅपिड फायरची उत्तरे दिली होती. त्यामध्ये तिला एक मजेशीर प्रश्न विचारला होता. प्रभास, टाइगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन यामध्ये फ्लर्ट, डेट आणि लग्न यातील कोणती गोष्ट तू कोणासोबत करशील? यावर क्रिती थोडी गडबडली थोडा वेळ थांबली आणि मग म्हणाली, “कार्तिक आर्यन बरोबर फ्लर्ट, टायगर श्रॉफला डेट आणि प्रभासशी लग्न करायचं मी जास्त पसंत करेल.” (kriti sanon wants to date tiger shroff know whom she want to get married)

क्रितीच्या या उत्तरमुळे सर्वच चकित झाले असून, सध्या सर्वत्र तिच्या या उत्तराचीच चर्चा सुरू आहे. तिचे फॅन्स तिला यावरून खूप कमेंट करत आहेत. तिच्या या हटके उत्तराने प्रभास, टाइगर श्रॉफ आणि कार्तिक या तिघांनाही विचार करायला भाग पाडलं असेल.

क्रितीने पहिला चित्रपट टायगर श्रॉफसोबत केला होता. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तसेच तिने कार्तिक आर्यनसोबत देखील काम केले आहे. लवकरच ती प्रभाससह ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, अलिकडेच तिने पंकज त्रिपाठी बरोबर ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. लवकरच वरुण धवनसोबत ‘भेडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ‘बच्चन पांडे’, ‘हम दो हमारे दो’ आणि ‘गणपत’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा