Monday, June 24, 2024

कृती सेननने पूर्ण केले ‘आदिपुरुष’चे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित दिली माहिती

कलाकारांसाठी चित्रपटाच्या शुटिंग खूपच मजेशीर असते. यासोबतच वेगवेगळे दिग्दर्शक, कलाकार हे सर्व अनेक महिने एकत्र राहून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत असतात. या काळात प्रत्येक जणं एकमेकांच्या अगदी जवळ आलेला असतो. प्रत्येकालाच सेटवर आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यात जर सिनेमा जरा वेगळा आणि भव्य दिव्य असेल तर प्रत्येक कलाकाराला चित्रपटाशी शेवट्पर्यंत जोडले असावे अशी भावना असते. जेव्हा मोठमोठ्या चित्रपटांचे कलाकार शूटिंग पूर्ण करतात तेव्हा ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यांची माहिती देत चित्रपटासंबंधीच्या भावना व्यक्त करतात.

लवकरच दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. कलाकार, सिनेमाची कथा, दिग्दर्शक आदी अनेक कारणांमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात अधिकाधिक उत्सुकता निर्माण करत आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात काम करणाऱ्या कृती सेननने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

कृतीने नुकतीच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. याच संदर्भात तिने एक पोस्ट केली असून, दोन फोटो पोस्ट केले आहेत. दिग्दर्शक ओम राऊतसोबत असलेला एक फोटो आणि एका फोटोमध्ये ती केक कापताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “विश्वासच होत नाही की, हा प्रवास एवढ्या लवकर संपेल. मला ‘जानकी’ बनवण्यासाठी आणि ही भूमिका मला देऊन मी ती नीट सांभाळू शकते हा विश्वास माझ्यावर दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे व्हिजन खूपच दूरगामी आहे. हा सिनेमा आणि यातील हे पात्र यावर मला नेहमीच गर्व असेल.”

काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. ओम राऊतने त्या संदर्भातली एक पोस्ट शेअर केली होती. ओम राऊत दिग्दर्शित या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि टि सिरीज कंपनी करत आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीच्या काळात या सिनेमाला आणि सैफच्या भूमिकेला प्रचंड विरोध झाला. मात्र त्या विरोधावर सैफ अली खानच्या फॅन्सची इच्छा मोठी ठरली आणि हा विरोध थोड्या काळातच मावळला देखील. हा सिनेमा हिंदीसोबत, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम या भाषांमध्ये तयार होणार असून, यात प्रभास, सैफ, कृती यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा