भारतीय चित्रपटसृष्टीतील जलद गतीने उभरणारी अभिनेत्री क्रिती शेट्टीने तिच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तिने ‘उप्पेना’ या चित्रपटातून तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात ती वैष्णव तेजसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तेव्हापासून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती खूपच प्रसिद्ध झाली आहे. क्रिती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, सौंदर्यामुळेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
क्रिती शेट्टी दिसायला खूपच सुंदर आहे. पडद्यावरील अभिनयापेक्षा तिने तिच्या सौंदर्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. क्रितीची स्माईलही अप्रतिम आहे. तिच्याबद्दल जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. चेहर्यावरुन ती खूप निरागस दिसते. तसे, ती सध्या किशोरवयीन असून तिचे वय 17 वर्षे आहे. पण वयाच्या दृष्टीने ती अधिक प्रौढ आहे आणि ही गोष्ट तिच्या अभिनयातही दिसून येते.
क्रिती शेट्टीचा जन्म 21 सप्टेंबर 2003 रोजी कर्नाटकातील मंगलोरमध्ये झाला. ती कर्नाटकातील एका कन्नड भाषिक कुटुंबातील मुलगी आहे. ती मुंबईतच वाढली आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ती मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे. शिक्षण चालू असतानाच ती बऱ्याच व्यावसायिक जाहिरातींमध्येही दिसली आहे.
क्रितीने ऋतिक रोशनच्या ‘सुपर 30’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील क्रितीच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली. ‘सुपर 30’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. याव्यतिरिक्त ‘उप्पेना’मध्ये तिची भूमिका गाजल्यानंतर तिने तिच्या मानधनात वाढ केली असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे वृत्तानुसार, तिने उप्पेना चित्रपटासाठी ६ लाख रुपये मानधन घेतले होते. यानंतर आता ती प्रत्येक चित्रपटासाठी ६० लाख रुपये घेणार आहे.
सध्या क्रिती नॅचरल स्टार नानीच्या ‘शाम सिंग रॉय’ आणि ‘आ अम्माइ गुरिंची मीकू चेप्पली’ मध्ये काम करत आहे. हे दोन्ही तेलुगु चित्रपट आहेत. अनिल रविपुडी दिग्दर्शित महेश बाबूच्या आगामी चित्रपटासाठीही क्रितीशी संपर्क साधण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त क्रिती एक शास्त्रीय नर्तिका आहे. तसेच, तिला झाडे लावण्याचाही खूप छंद आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तिचा अंदाजच निराळा! अभिनेत्री मलायका अरोराने भिंतीवर ‘हा’ योगा करून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक