Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘जुग जुग जिओ’ होणार फ्लॉप? पाहा कोण म्हणतंय असं?

‘जुग जुग जिओ’ होणार फ्लॉप? पाहा कोण म्हणतंय असं?

प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) ही या चित्रपटाची स्टारकास्ट आजकाल प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने ‘जुग जुग जिओ’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन रिलीझ होण्याआधीच फ्लॉप घोषित केले आहे. 

‘या’ चित्रपट निर्मात्याने ‘जुग जुग जिओ’ला म्हटले फ्लॉप
खरं तर, ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाची चर्चा वाढत आहे. ज्या अंतर्गत बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल राशिद खान (KRK) याने वरुण धवन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीच फ्लॉप घोषित केला आहे. (krk on varun dhawan kiara advani jug jugg jeeyo box office collection)

केआरकेने अलीकडेच त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे की, “पंजाबी चित्रपट जुग जुग जिओचे आगाऊ बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. हा चित्रपट ओपनिंग डे फक्त २-३ कोटींची कमाई करेल. त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता आहे.” याआधीही आणखी एका ट्वीटमध्ये केआरकेने करण जोहर आणि त्याच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाला बकवास म्हटले आहे.

हा मेगा स्टार चित्रपट २४ जूनला म्हणजेच पुढच्या आठवड्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या फॅमिली ड्रामा चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनीष पॉल (Manish Paul) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यांवरून आणि ट्रेलरवरून हा एक चांगला चित्रपट मानला जात आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा