Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘केस मागे घ्या, व्हिडिओ डिलीट करतो’, सलमान खानने मानहानी दावा केल्यानंतर अभिनेता केआरकेची विनंती

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा “राधे: योर मोस्ट वाँटेड भाई” हा चित्रपट मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. कधी या चित्रपटावर होणाऱ्या मिम्समुळे, तर कधी बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या कमाईमुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी फक्त भारतात या चित्रपटाची कमाई 108 कोटींपेक्षा ही जास्त झाली होती. हे सलमान खानच्या इतर चित्रपटांपेक्षा झालेली सर्वात जास्त कमाई आहे. या चित्रपटामुळे सलमान खानला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, या चित्रपटाकडून त्यांना ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. कमाल आर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाबाबत वाईट गोष्टी बोलल्या आहेत. यानंतर सलमान खानच्या अधिकृत टीमने त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला आहे. आता केआरकेने एक ट्वीट करून ही तक्रार मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द जसे बदलले आहेत, त्यावर विश्वास ठेवणे देखील अवघड आहे.

सलमान खानने तक्रार करण्याच्या आधी केआरकेचा भांडण्याचा मूड होता. परंतु कदाचित त्यानंतर त्याला समजले की, सलमान खानसोबत पंगा घेतला तर आपल्याला खूप महागात पडेल. त्यांनतर केआरकेने एक ट्वीट करून त्यांचा बदललेला अंदाज सर्वांना दाखवला आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1397343649277435907

केआरकेने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मी इथे सलमान भाईचे चित्रपटातील करिअर खराब करण्यासाठी नाही बसलो. मी हे रिव्ह्यू केवळ मस्तीसाठी देत असतो. परंतु माझ्या या रिव्ह्यूनंतर सलमान भाईने केस दाखल केली आहे. म्हणजे याचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसत आहे. म्हणूनच आता मी त्यांच्या कोणत्याही चित्रपटावर प्रतिक्रिया देणार नाही.”

https://twitter.com/kamaalrkhan/status/1397396206997839878

केआरकेने पुढचे ट्वीट सलमान खानचे वडील सलीम खान यांना टॅग करून लिहिले आहे की, “तक्रार करण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही सलमान भाईला सांगा की, ही केस मागे घ्या. इथून पुढे मी त्यांच्या कोणत्याही चित्रपटावर रिव्ह्यू देणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी केलेला व्हिडिओ देखील डिलीट करतो.”

त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे, तर काही युजरचे असे म्हणणे आहे की, कदाचित त्याला धमकी दिली असेल म्हणून त्याने त्याचा स्वर बदलला. परंतु आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, सलमान खान त्याच्या ट्विटवर काय प्रतिक्रिया देतो. तसेच केस मागे घेतोय की नाही? याबद्दलही समजेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा