Wednesday, July 3, 2024

अर्रर्र! कृष्णा अभिषेकच्या बहिणीची अवस्था पाहून घाबरले लोक ओठ आणि कपाळातून रक्ताच्या थारोळ्या

सध्या सर्वांना हॅलोविनच्या भुताने पछाडले आहे. सहसा, जिथे कलाकार त्यांच्या सौंदर्याने इतरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात, तिथे हॅलोविनच्या निमित्ताने त्यांनी सर्वात भयानक लूक केला आहे. सध्या हॅलोविन आठवडा सुरू आहे. अशा परिस्थितीत कलाकार भितीदायक लूकमध्ये दिसत आहेत. आतापर्यंत अनेक स्टार्सचे हॅलोवीन लूक समोर आले आहेत. त्याचवेळी, आता कृष्णा अभिषेक याची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग हिचेही काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमधला तिचा भितीदायक लूक पाहून कुणीही घाबरून जाईल.

आरती सिंग (aarti singh) नुकतीच अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) यांच्या हॅलोविन पार्टीत पोहोचली. यादरम्यान आरतीने तिच्या लूकने सर्वांना घाबरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अभिनेत्रीकडे पाहून असे दिसते की, तिने रक्त पिणाऱ्या व्हॅम्पायर म्हणजेच ड्रॅक्युलाला पकडले आहे.

aarti singh

आरती सिंग काळ्या रंगाचा लांब ड्रेस परिधान करून पार्टीत पोहोचली. त्याच वेळी, तिचे केस विस्कटलेले हाेते आणि गडद लाल रंगाचे लिपस्टिक लावले हाेते. एवढेच नाही तर कपाळ आणि ओठातून रक्तासारखे वाहणारे लाल रंग देखील तिने लावला हाेता. या दरम्यान आरती खरच खूप भितीदायक दिसत होती. आरती सिंहचा हॅलोवीन पार्टीचा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. यावर युजर्स विविध कमेंट करुन प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनयासोबतच आरती सिंग सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आरतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने 2007 मध्ये ‘मायका’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘उत्तरन’, ‘परिचय’, ‘संतोषी मां’, अशा अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. यासोबतच आरती ‘बिग बॉस 13’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चार किलो मेकअप…’,राखी सावंतने उडवली शर्लिन चोप्राची खिल्ली; व्हिडिओ पाहून यूजर्स चांगलेच भडकले

राज ठाकरेंनी केले अशोक मामांचे कौतुक! म्हणाले, ‘त्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून…’

हे देखील वाचा