छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्री ऑनस्क्रीन जेवढ्या बोल्ड असतात, कदाचित त्यापेक्षाही जास्त त्या खऱ्या आयुष्यातही बोल्ड असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या फिटनेस आणि बोल्ड अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अभिनेत्री इतर कुणी नसून अभिनेता कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह ही आहे. कश्मीराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
कश्मीरा शाह (Kashmera Shah) हिने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती ठुमके लावताना दिसत आहे. अभिनेत्री स्विमिंग पूलच्या शेजारी बिकिनी परिधान करून थिरकत आहे. खरं तर, आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या कश्मीराने एका सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
कश्मीराने तिच्या ‘जंगल’ या सिनेमाला २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात हा व्हिडिओ शेअर केला आहे. कश्मीराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कश्मीरा सुपरकूल मूडमध्ये दिसत आहे. ती स्विमिंग पूलशेजारी मजा करत आहे.
View this post on Instagram
कश्मीराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ती स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर ऍनिमल प्रिंटच्या बिकिनीत दिसत आहे. व्हिडिओत कश्मीरा, ‘पतली कमर’ या झक्कास गाण्यावर डान्स करत आहे. तिच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कश्मीराने लिहिले आहे की, “जंगल सिनेमाला २२ वर्षे पूर्ण.” या सिनेमात कश्मीरासह फरदीन खान, उर्मिला मातोंडकर, सुनील शेट्टी आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका होत्या.
कश्मीराचे वय ५० आहे. या वयातही कश्मीराच्या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या व्हिडिओला १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, राखी सावंत आणि रोनित रॉय यांनी कमेंट करत कश्मीराच्या कौतुकाचे पूल बांधले आहेत.
View this post on Instagram
कृष्णा अभिषेकसोबत लग्न
कश्मीरा शाह हिने २०१३ साली अभिनेता कृष्णा अभिषेक याच्यासोबत गुपचूप संसार थाटला होता. त्यांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. कृष्णाचे वय ३६ आहे, तर कश्मीरा ही ४८ वर्षांची आहे. त्यांना राया आणि कृशांग ही दोन जुळी मुलं आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिथुन चक्रवर्तींची सून म्हणतेय ‘नको गं बाई’, लग्नाच्या चार वर्षांनंतरही बनायचं नाही आई
अभिनयासाठी खाल्ला वडिलांचा मार, आईकडून ५०० रुपये घेत पोहोचला मुंबईत; आता कोटींचा बनलाय मालक