मागील काही दिवसांपासून योगगुरू रामदेव बाबा हे ऍलोपॅथी औषधोपचारावर केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहेत. रामदेव बाबा यांचे असे म्हणणे आहे की, एलोपॅथी औषधे घेतल्यामुळे जितक्या लोकांचा बळी जात आहे, तितक्या लोकांचा कोरोनाने देखील मृत्यू होत नाहीये. परंतु त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. परंतु आयएमए आणि फार्मा कंपन्यांना 25 प्रश्न विचारल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकार देखील एलोपॅथी औषधांच्या या वादामध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये कवी कुमार विश्वास यांनी रामदेव बाबांवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार हा व्हिडिओ 2019 मधील एका कवी संमेलनातील आहे, जेव्हा कुमार यांनी रामदेव बाबांवर एक टिपण्णी केली होती. ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की, “या देशातील दुकानांमध्ये सामान असो किंवा नसो पण विकता केवळ दोन लोकांना आले. जे आता टॉपला आहेत. बाबांनी काय विकले. 12 वर्षापर्यंत बाबांनी टीव्हीवर येऊन सांगितले की, काम धंदा सोडून द्या आणि योगा करा. आता आम्ही योगा करत आहोत, तर बाबा काम- धंदा करत आहेत.”
https://www.facebook.com/anandchamparan/videos/4067405820002885/?t=0
त्यांनी पुढे सांगितले की, “ते असे सामान विकत आहेत. जर तुम्ही ते सामान खरेदी नाही केले, तर तुम्हाला असे वाटेल की, तुम्हाला हिंदू धर्मामधून बाहेर काढले जाईल. ते फिनाईल विकतात. गो मूत्रापासून गोनाइल बनवतात. हे सगळं ठीक आहे, पण बाटलीवर लिहितात की, गायीला कत्तल खान्यात जाण्यापासून वाचवा. त्यामुळे येथील माणसांना असे वाटते की, जर दोन बाटल्या खरेदी नाही केल्या तर गाय जाईल.”
या व्हिडिओमध्ये कुमार विश्वास यांनी बाबांच्या मीठ विकण्याच्या पद्धतीवर देखील भाष्य केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आयएमएने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अर्ज केला होता की, रामदेव बाबांविरुद्ध देशद्रोहाचा आरोप लावा. आयएमए यांचा असा आरोप आहे की, रामदेव बाबा यांनी कोव्हिड- 19 च्या उपचारासाठी सरकारच्या नियमांना आव्हान दिले आणि लसीकरणाच्या कंपन्यांना बदनाम केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-