अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) आणि त्याची पत्नी नयना बच्चन (Naina Bachchan) आई बाबा झाले आहेत. हो कुणाल कपूरच्या बायकोने नयना बच्चनने एका मुलाला जन्म दिला असून, ही आनंदची बातमी खुद्द कुणाल कपूरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे. नयना ही महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी असल्याने या बाळाच्या जन्मामुळे पुन्हा एकदा बिग बी आजोबा झाले आहेत. कुणाल कपूर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता असून, त्याची गणती प्रतिभावान कलाकारांमध्ये होते.
कुणालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझ्या सर्व शुभ चिंतकांना मला हे सांगताना खूपच आनंद होत असून मी आणि नयना एका मुलाचे आईबाबा झालो आहोत. आम्हाला हा आनंद देण्यासाठी देवाचे खूप आभार.” या पोस्टसोबतच त्याने एक हार्ट ईमोजी देखील पोस्ट केला आहे. कुणालच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडमधून देखील त्याच्यावर आणि नयनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऋतिक रोशन, सुजैन खान, श्वेता बच्चन, अंगद बेदी आदी अनेक कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
कुणाल आणि नयनाने २०१५ साली लग्न केले होते. नयना ही अमिताभ बच्चन यांचे भाऊ असणाऱ्या अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. कुणाल एक अभिनेत्यासोबतच निर्माता आणि लेखक म्हणून देखील ओळखला जातो. कुणाल आणि नयना यांनी नयनाच्या प्रेग्नन्सीची बातमी खूपच गुप्त ठेवली होती. आता बाळ झाल्यानंतर कुणालने थेट गोड बातमीच सर्वांसोबत शेअर केली आहे.
कुणालने त्यांचे बॉलिवूडमधील करिअर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरु केले होते. अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिका असणाऱ्या ‘अक्स’ चित्रपटाचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यानंतर कुणालने अभिनेता होण्याचे ठरवले आणि ‘मीनाक्षी अ टेल ऑफ थ्रि सिटीज’ सिनेमातून त्याने तब्बूसोबत बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यांनतर तो आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’ मध्ये देखील दिसला. या सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेयरचे सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्याची नामांकन देखील मिळाले होते. त्यानंतर तो यशराजच्या ‘लागा चुनरी में दाग’, ‘आजा नचले’ आणि ‘बचना ऐ हसीनो’ चित्रपटांमध्ये दिसला.
हेही वाचा :