Monday, July 1, 2024

कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

‘कुंडली भाग्य’ हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्न्समुळे नेहमीच हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा ठरला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून, आजही हा शो टीआरपीमध्ये टॉपला असतो. शोमध्ये सतत काही ना काही ट्विस्ट येत असल्यामुळे प्रेक्षक आवडीने आणि आतुरतेने शो बघतात. काही महिन्यांपूर्वीच शोमध्ये एक ट्विस्ट आला ज्यात धीरज धुपरने शो सोडल्यामुळे अभिनेता शक्ती अरोराची एन्ट्री झाली होती. आता पुन्हा एकदा शोमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार शोमधून एका अभिनेत्याची सुट्टी होणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शक्ती अरोरा आहे. शोमध्ये मुख्य भूमिकेत असणारा शक्ती अरोराने सात महिन्यांपूर्वीच शोमध्ये ‘अर्जुन’ ही भूमिका साकारत एन्ट्री घेतली होती. आता शक्ती हा शो सोडणार आहे. जेव्हा धीरज धुपरने हा शो सोडला तेव्हा शक्ती अरोराने त्यांच्या रिप्लेस केले होते. तो शोमध्ये अर्जुन ही भूमिका साकारत आहे. आता लवकरच शोमध्ये २० वर्षांचा लीप येणार असून, तेव्हा शक्ती अरोरा यात दिसणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

एका माहितीनुसार, शो संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, श्रद्धा लीपनंतर शोमध्ये दिसेल आणि नवीन पिढीची आई म्हणून भूमिका साकारेल. मात्र शक्तीला शो सोडायचा आहे. कारण कदाचित शक्ती या लिपसाठी तयार नाही. त्यामुळे तो शो सोडणार आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

तत्पूर्वी प्रीता आणि करण ही फॅन्सची सर्वात आवडती जोडी असून, जेव्हा धीराजने शो सोडला तेव्हा सर्वांना खूप दुःख झाले होते. त्यानंतर शक्तीला स्वीकारायला बराच काळ गेला आता पुन्हा लीप येणार, शक्ती नसल्यामुळे श्रद्धा कोणत्या अभिनेत्यासोबत दिसणार आणि तेव्हा फॅन्स त्या जोडीला स्वीकारणार का? हे सर्व वेळ आल्यावरच समजेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती

सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती

हे देखील वाचा