Friday, August 8, 2025
Home अन्य श्रद्धा आर्या तिच्या लग्नाबद्दल म्हणते, ‘ते’ काहीच करणार नाही मलाच काहीतरी करावे लागेल

श्रद्धा आर्या तिच्या लग्नाबद्दल म्हणते, ‘ते’ काहीच करणार नाही मलाच काहीतरी करावे लागेल

छोट्या पडद्यापासून साऊथ चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू पसरवणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिने नुकताच तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या लग्नाचे दुःख व्यक्त करताना दिसत आहे. वयाच्या ३४ व्या वर्षीही ती अजून अविवाहित आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा सांगत आहे की तिचे आई-वडील तिच्या लग्नाबद्दल काहीच बोलत नाहीत, आणि एकदिवस ते अचानक तिच्या लग्नाचा विषय काढतात.

श्रद्धाने तिचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ हे हिंदी गाणे वाजत असल्याचे ऐकायला मिळत आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे एक बॉक्स तयार करून त्यामध्ये लिहिले की ‘जेव्हा मम्मी पप्पा शेवटी म्हणतात, आता हीच लग्न झालं पाहिजे’ यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘… ते विषय नाही काढणार, मलाच काहीतरी करावे लागेल’. तिच्या या व्हिडिओवरून आणि कॅप्शनवरून एक गोष्ट स्पष्टपणे होत आहे की, ती तिच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. श्रद्धाचा हा एक फनी व्हिडिओ असून तिने तो गंमत म्हणून पोस्ट केला आहे.

एकदा मीडियामध्ये श्रध्दाच्या साखरपुड्याबद्दलच्या बातम्या आल्या होत्या की, २०१५ मध्ये तिने एनआरआय जयंतसोबत साखरपुडा केला होता. मात्र, नंतर तिने लग्न करण्यास नकार दिला होता. या गोष्टीमुळे तिच्या कुटुंबातील सदस्य ते तिच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती टीव्ही मालिका ‘कुंडली भाग्य’ मधून खूपच लोकप्रिय झाली. पण त्याआधी तिने ‘कलवनिन कधली’ या तमिळ चित्रपटसृष्टीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने २००७ मध्ये तेलुगू चित्रपटात पदार्पण केले होते, त्यामध्ये तिचा पहिला चित्रपट ‘गोदावा’ होता. ज्यात तिच्या विरुद्ध वैभव रेड्डी मुख्य भूमिकेत होते. याशिवाय २०१० मध्ये ‘वंदे मातरम्’ या चित्रपटातून श्रद्धाने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार मामूटी मुख्य भूमिकेत होते. मग ती ‘डबल डेकर’ चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा