‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड प्रसिद्ध आहे. यातील कलाकार कुशल बद्रिके लोकप्रिय असून नुकतेच त्याने याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबरोबर मोठ्या स्क्रीनवर डान्स करताना दिसला आहे.
चला हवा येऊ द्याच्या मंचावर ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाची टीम आली होती. यावेळीच्या एका स्किटचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कुशलने लिहिलंय की, “सोनाली कुलकर्णीबरोबर फुल स्क्रीनवर नाचण्याची माझी ‘पांडू’ पासूनची इच्छा होती फायनली ती पूर्ण झाली बाबा एकदाची.”
View this post on Instagram
त्याच्या या विनोदी व्हिडिओवर चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया आल्या आहेत.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)