‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. ऑन स्क्रीन तर तो रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवतोच, पण ऑफस्क्रीन देखील त्याच्या खासगी आयुष्यात काय काय घडते या विषयीची माहिती सोशल मीडिया मार्फत त्याच्या चाहत्यांना देत असतो. अशात त्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
कुशलने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका गवताळ प्रदेशात असल्याचे दिसते. त्याने चालत असतानाची एक पोझ देत फोटो काढला आहे. तसेच फोटोमध्ये मागे रॉयल एनफिल्ड गाडी देखील आहे. कुशलने हा फोटो शेअर करत लिहिले की, “वाट फुटेल तिथे जाणं मला मान्य नाही, आपली वाट आपण शोधावी. म्हणजे हवं तिथे पोहोचुच असं नाही. पण प्रवास मात्र सुंदर होतो हे नक्की.”
त्याचे हे लक्षवेधी कॅप्शन सर्वांनाच आवडले आहे. अनेक जण कमेंटमधून त्याच्या कॅप्शनचे कौतुक करत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “परफेक्ट लिहिले आहे सर.” तर दुसर्या एकाने असे लिहिले आहे की, “तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची” तसेच अनेकांनी त्याला हार्ट आणि फायर ईमोजी देखील पाठवले आहेत.
कुशलच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत अनेक नाटके, चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये अभिनय केलेला आहे. ‘एक होता काऊ’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भाऊचा धक्का’, ‘जत्रा’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार अभिनयाने स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’मधून त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे या शोमध्ये जंगी स्वागत होते. त्यानंतर कुशल आणि त्याचे इतर सहकारी मिळून येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला पोट दुखेपर्यंत हसवतात.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल
-‘अगर हम शायर होते तो…’ अनुजा साठेच्या ग्लॅमरस फोटोवरील चाहत्याची कमेंट ठरतीय लक्षवेधी