मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा विनोदवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुशल बद्रिकेने त्याच्या प्रतिभेने स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. अतिशय कष्टाने आणि संघर्षाने त्याने त्याचे करियर घडवले आणि आज तो इथवर पोहचला. चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून तर त्याची खरी प्रतिभा लोकांसमोर आली आणि कुशल जगभरात प्रसिद्ध झाला. या शोमधील त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अशी लोकप्रियता त्याने निर्माण केली आहे. विनोदवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुशलची एकदम वेगळी अर्थात वैचारिक बाजू सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरील त्याच्या पोस्ट पाहून कुशल किती उत्तम लिहितो आणि तो माणूस म्हणून कसा आहे हे देखील कळते. आता देखील कुशल त्याच्या अशाच एका सोशल मीडिया पोस्टमुळेच चर्चेत आला आहे.
कुशलने नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्याच्या या फोटोसोबत त्याने जे कॅप्शन दिले त्याची खूपच चर्चा आहे. कुशने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “Struggle काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच राहून गेलं !
View this post on Instagram
मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं.
आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो…. फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली…….. (सुकून)”
कुशलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्याच्या लिखाणाचे कौतुक तर केले सोबतच त्याच्या विचारांचे देखील केले आहे. कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहे. लवकरच तो ‘रावरंभा’ सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट