कुश सिन्हानं अलीकडच्या एका मुलाखतीत सोनाक्षीने वेगळ्या धर्मात लग्न केल्यामुळे घरात वाद झाला का यावर उघडपणे बोललं. त्यानं हेही स्पष्ट केलं की तो सोनाक्षीच्या लग्नाला होता की नाही.
सोनाक्षी सिन्हाने ज़हीर इक़बालसोबत लग्न केलं.पण तिच्या लग्नात तिचे दोघे भाऊ लव आणि कुश दिसलेच नाहीत.त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की,वेगळ्या धर्मात लग्न केल्यामुळे तिचे भाऊ नाराज आहेत.आता तिचा भाऊ कुश सिन्हानं हे सगळं खरं आहे का नाही,यावर स्पष्ट बोलून अफवांवर पूर्णविराम दिला आहे. कुश सिन्हानं अलीकडे झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,तो सोनाक्षीच्या लग्नाला हजर होता.यासोबतच त्यानं घरात काही वाद वगैरे आहे अशा अफवांनाही साफ नकार दिला. तो म्हणाला, “मी फार साधं आयुष्य जगतो.मला माझं खरं माहीत आहे,मग लोक काहीही बोलू देत,मला काही फरक पडत नाही”.
कुश म्हणाला,”लोक असं बोलत होते की,मी आणि माझा भाऊ लव,दोघंही लग्नात नव्हतो.पण काही लोक उगाचच चर्चा करत होते.मी ठरवलं की,जर कुणाला त्यावर बोलायचं असेल,तर तो त्यांचा प्रश्न आहे मला काही घेणंदेणं नाही”. तो पुढे म्हणाला,”जर मी फोटोमध्ये दिसलो नाही,याचा अर्थ असा नाही की मी तिथे नव्हतो.प्रत्येक वेळी सगळं जगाला दाखवणं गरजेचं नसतं”.
लव सिन्हा लग्नात होता का,असं विचारल्यावर कुश म्हणाला,”मी लवच्या वतीने काहीही बोलू इच्छित नाही,म्हणून मी सरळ आणि स्पष्ट उत्तर दिलं.तसंच मी सोनाक्षीच्याही वतीने काही बोलणार नाही”. तो पुढे म्हणाला,”माझ्या मते,प्रत्येकाला आपली गोष्ट जगायचं स्वातंत्र्य असायला हवं.जोपर्यंत ते प्रामाणिक आहेत,तोपर्यंत ते काय करतायत यावर मला काहीच आक्षेप नाही”.
कुशनं सोनाक्षीच्या निवडीला पाठिंबा दिला.तो म्हणाला,”ही तिची वैयक्तिक पसंती आहे आणि मी तिचा सन्मान करतो.कदाचित मी तिच्या दैनंदिन गोष्टींत फार लक्ष देत नाही,पण तिची निवड मला मान्य आहे.ती मोठी आहे,स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे.आणि माझे वडील नेहमी म्हणायचे,जोपर्यंत ती काही गैरकायदेशीर करत नाही,तोपर्यंत सगळं ठिक आहे”. जेव्हा कुशला विचारलं,”तुझं ज़हीरसोबत कसं जमतं?” तेव्हा तो हसून म्हणाला,”सगळं मस्त आहे! मला त्याच्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही.आमचं ठीक आहे”.
सोनाक्षी आणि ज़हीरने २३ जून २०२४ रोजी आपल्या मित्र-परिवारासोबत खासगी पद्धतीने लग्न केलं.तिचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा या दोघांसोबत फोटो काढताना दिसले.पण तिचा भाऊ लव सिन्हा तिथे नव्हता,आणि त्यामुळेच अनेक अंदाज लावले जाऊ लागले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या कारणामुळे मोहित सुरी आणि इमरान हाश्मी आता करत नाहीत एकत्र काम; मोहित म्हणतो आमच्यात वितुष्ट…