Sunday, February 23, 2025
Home अन्य ‘या’ कारणामुळे अब्जाधीश कायली जेनरला चाहत्यांकडे करावी लागली पैशांसाठी मागणी; मात्र नेटकऱ्यांनी ऐकवले खरे-खोटे!

‘या’ कारणामुळे अब्जाधीश कायली जेनरला चाहत्यांकडे करावी लागली पैशांसाठी मागणी; मात्र नेटकऱ्यांनी ऐकवले खरे-खोटे!

अमेरिकन मॉडेल आणि कॉस्मेटिक बिझनेस टायकून कायली जेनर तिच्या ग्लॅमरस लूकसाठी बरीच चर्चेत असते. कायलीची सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. ती या दिवसांत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण बरेच आश्चर्यकारक आणि मनोरंजक आहे.

अलीकडेच कायलीने एक ट्वीट केले होते, जे सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ट्विटद्वारे, कायलीने तिच्या मेकअप आर्टिस्टच्या शस्त्रक्रियेसाठी चाहत्यांना दान देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतर ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

वास्तविक, अब्जाधीश कायली जेनरने एका ट्विटद्वारे देणग्यांसाठी चाहत्यांकडे आवाहन केले. कायली म्हणाली की, तिच्या मेकअप आर्टिस्टच्या शस्त्रक्रियेसाठी 60 हजार डॉलर्सची आवश्यकता आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कायली जेनरने शस्त्रक्रियेसाठी 5000 डॉलर दिले आहेत आणि उर्वरित रकमेसाठी ती मदत मागत आहे. मात्र, हे पाहून नेटकरी कायलीला खूप काही ऐकवत आहेत.

एका युजरने लिहिले की, “दिवसाला साडेचार दशलक्ष डॉलर्स कमावणारी अब्जाधीश, आपल्या मेकअप आर्टिस्टचा जीव वाचवण्यासाठी 60 हजार डॉलर्स देऊ शकत नाही. धिक्कार आहे अशा व्यक्तीवर.” त्याचवेळी दुसर्‍या एका युजरने लिहिले की, “कायलीसाठी आता मनात आदर नाही राहिला, अशी मुलगी जी सहजपणे इतके पैसे देऊ शकते, ती चाहत्यांना देणगीचे आवाहन करत आहे.”

कायली जेनर सन 2018 मध्ये, फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गला मागे टाकत, सर्वात कमी वयातील अब्जाधीश बनली होती. तिने 2020 मध्ये जाहीर केलेल्या फोर्ब्स मासिकाच्या यादीमध्ये प्रथम स्थान मिळविले. त्यानुसार, कायलीने एका वर्षात 590 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

हे देखील वाचा