Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड अभिनेता आमिर खानला करायचा आहे महाभारतावर चित्रपट, पण ‘या’ एका गोष्टीची वाटते भिती

अभिनेता आमिर खानला करायचा आहे महाभारतावर चित्रपट, पण ‘या’ एका गोष्टीची वाटते भिती

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) एका कार्यक्रमादरम्यान, हिंदू पौराणिक कथा ‘महाभारत’ वर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली, अभिनेत्याने महाभारतावर चित्रपट बनवणे हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे  सांगितले. इतकेच नव्हेतर तो या गोष्टीचा गेल्या 10 वर्षांपासून विचार करत आहे असेही त्याने सांगितले. मात्र, ‘महाभारत’ चित्रपट बनवण्याची भीती वाटत असल्याचंही आमिरने म्हटलं आहे. 

आमिर खान हा बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या आमिर खानच्या लालसिंग चड्डा चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आमिर खान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.  यावेळी आमिर खानने त्याच्या ड्रिम प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे.

आमिर खान म्हणाला, “जेव्हा तुम्ही महाभारत बनवत असाल, तेव्हा तुम्ही चित्रपट बनवत नाही, तुम्ही यज्ञ करत आहात. तो चित्रपट नाही, त्याहून अधिक आहे. म्हणूनच मी त्यासाठी तयार नाही. मी ते करतो. भीती वाटते. ते समोर आणण्यासाठी. महाभारत तुम्हाला कधीही निराश करणार नाही, परंतु तुम्ही ते निराश करू शकता.”

आमिर खानने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की महाभारत’ बनवणे हे त्याचे स्वप्न आहे. तो म्हणाला की, “ही माझी इच्छा आहे. हा प्रकल्प खूप मोठा आहे. माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण जर मी आज ठरवलं की मी तो बनवणार आहे, तर मला त्याला 20 वर्षे द्यावी लागतील. जर मी हो म्हणालो आणि ते बनवायचे ठरवले, तर त्यासाठी फक्त अभ्यास करण्यासाठी आणि नंतर ते अंमलात आणण्यासाठी पाच वर्षे लागतील. ही सामग्री माझ्यासाठी खूप रोमांचक आहे.”

दरम्यान आमिर खानचा अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये आमिरशिवाय करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 5000 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.(laal singh chaddha star aamir khan shares an update on his dream project mahabharat says im not ready for it im afraid to)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

हे देखील वाचा