Wednesday, January 14, 2026
Home अन्य ना प्रमोशन, ना चर्चेचा गदारोळ; 50 लाखांचा चित्रपट ठरला सुपरहिट, 241 पट नफ्याची केली कमाल

ना प्रमोशन, ना चर्चेचा गदारोळ; 50 लाखांचा चित्रपट ठरला सुपरहिट, 241 पट नफ्याची केली कमाल

साल 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झाला असला, तरी त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास रचला आहे. मोठे स्टार्स नसतानाही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे ‘लालो: कृष्ण सदा सहायते’. रिलीज होताच हा गुजराती चित्रपट सिनेमागृहांमध्ये चांगलाच गाजला आणि भरघोस कमाई करत 2025 मधील सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे IMDb वरही या चित्रपटाला तब्बल 8.6 रेटिंग मिळाली आहे.

2025 मध्ये ‘कांतारा: चॅप्टर 1’, ‘धुरंधर’, ‘छावा’ आणि ‘सैयारा’सारख्या मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मात्र, त्याचवेळी अगदी शांतपणे प्रदर्शित झालेल्या या कमी बजेटच्या गुजराती चित्रपटाने (Gujarati film) सर्वांनाच धक्का दिला. केवळ 50 लाख रुपये बजेट असलेल्या ‘लालो: कृष्ण सदा सहायते’कडून फारशी अपेक्षा नव्हती. ओपनिंग कलेक्शनही साधारणच होते. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 33 लाख रुपये कमावले, तर दुसऱ्या आठवड्यात 27 लाखांची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात मात्र चित्रपटाने गती पकडत 62 लाख रुपये कमावले.

खरा टर्निंग पॉइंट चौथ्या आठवड्यात आला. चौथ्या शनिवारी एका दिवसातच चित्रपटाने 1 कोटी रुपयांची कमाई केली आणि ट्रेडला चकित केले. चौथ्या रविवारी फक्त गुजराती व्हर्जनमधून 1.85 कोटींची कमाई झाली. मजबूत वर्ड-ऑफ-माऊथ आणि रिपीट ऑडियन्समुळे हा चित्रपट जवळपास तीन महिने सिनेमागृहांत टिकून राहिला आणि अखेर जागतिक बॉक्स ऑफिसवर 120.58 कोटी रुपये कमावले.

‘लालो: कृष्ण सदा सहायते’ हा आता अधिकृतपणे आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा गुजराती चित्रपट ठरला आहे. तसेच 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला गुजराती चित्रपट बनला आहे. हा एक भक्तीप्रधान ड्रामा असून, यात रीवा रच्छ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी, मिस्टी कदेचा, अंशु जोशी, किन्नल नायक, पारुल राज्यगुरू आणि जयदीप तिमन्या यांची प्रमुख भूमिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘राहु केतु’च्या रिलीजपूर्वी पुलकित सम्राटने कॉमेडीबाबत आपले विचार मांडले, कपिल शर्माचे केले मनापासून कौतुक

हे देखील वाचा