सध्या बॉलिवूडमधल्या स्टार्समध्ये लाबुबू डॉल्सचं जबरदस्त क्रेझ चाललंय. आता सेलिब्रिटी कुठेही जाताना स्टाईल म्हणून लाबुबू डॉल्स बरोबर घेतात! लाबुबू ही एक थोडीशी विचित्र पण क्युट दिसणारी डॉल आहे. तिची सुरुवात २०१५ साली ‘द मॉन्स्टर्स’ नावाच्या पुस्तकातून झाली होती. पण आता ती पॉप मार्ट या कंपनीची सगळ्यात फेमस आणि ट्रेंडिंग डॉल बनली आहे. ही डॉल अशा बॉक्समध्ये येते की, तो उघडेपर्यंत कळतच नाही की आत कोणती डॉल आहे! मजेशीर गोष्ट म्हणजे आता ही डॉल फक्त लहान मुलांसाठीच नाही राहिली, तर बॉलिवूडमधले अनेक कलाकारही ती आपल्या स्टाईलचा भाग बनवत आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर आपल्या लाबुबू डॉल्सचे फोटो टाकत असतात. तर चला, आज आपण याच ट्रेंडवर थोडं गप्पा मारूया!
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल झाला होता. त्यामध्ये खुशी कपूर आपल्या बाबा बोनी कपूरला आपली लाबुबू डॉल दाखवत असते.आणि मग बोनी कपूरही हसत-हसत आपली ‘लाबुबू’ दाखवतात.पण गंमत म्हणजे ते ज्या लाबुबूबद्दल बोलत होते, तो औरी असतो जो मोठ्या लाबुबूच्या कॉस्ट्युममध्ये फर्शावर बसलेला असतो! हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना खूपच हसायला आलं, कारण तो खूप मजेशीर होता.
या व्हिडिओवर फक्त लोकांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही मजेशीर कमेंट्स केल्या.एका युजरने लिहिलं,”यांचं तर वेगळंच जग चाललंय!” तर दुसऱ्याने हसत लिहिलं,”हा लाबुबू तर खास लिमिटेड एडिशन आहे वाटतं!” अनन्या पांडेनेही गंमतीत प्रतिक्रिया दिली,”आता कळलं की लाबुबू एवढे भितीदायक का वाटतात!” अलीकडे मुंबई एअरपोर्टवर शिल्पा शेट्टीला खूप साऱ्या लाबुबू डॉल्ससोबत पाहिलं गेलं. तिने आपल्या बॅगेवर खूप सारी लाबुबू डॉल्स लावल्या होत्या. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपाेर्टनुसार,तिच्या त्या डॉल्सच्या कलेक्शनची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे.
शिल्पाने पॅपराजींना (फोटोग्राफर्स) पाहिल्यावर आपल्या बॅगसह मस्त पोझ दिल्या आणि फोटो काढून घेतले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले! मौनी रॉयने ७ जुलै २०२५ रोजी आपल्या सोशल मीडियावर लाबुबू डॉल्सच्या कलेक्शनचा फोटो पोस्ट केला होता. तिनं त्याला मजेशीर नाव दिलं “माझी प्लश आर्मी”! तिचं हे कलेक्शन पाहूनच कळतं की ती लाबुबूच्या या ट्रेंडमध्ये अगदी जोरात आहे आणि ते तिनं खरंच मनापासून घेतलंय.
8 जून 2025 ला ट्विंकल खन्नानं आपल्या सोशल मीडियावर लाबुबू डॉल्सची पोस्ट टाकली होती. पोस्टमध्ये तिनं लिहिलं,“या डॉल्समध्ये खरं प्रेम आहे”. मग तिनं गंमतीनं असंही म्हटलं,“लाबुबू आपल्याला सोडून नाही जात, पण हो! चोरी नक्कीच होऊ शकतात! कारण आपल्याला कधीच माहित नसतं की त्यांच्या बॉक्समध्ये नक्की कोणती डॉल आहे!”
लाबुबू डॉल्स आता फक्त लहान मुलांसाठी नाहीत, तर मोठ्यांनाही आणि सेलिब्रिटींनाही खूप आवडायला लागल्या आहेत. आता या डॉल्स सोशल मीडियावर अगदी स्टार्ससारख्या फेमस झाल्या आहेत! जसं आधी स्टायलिश फोन कव्हर किंवा बॅग दाखवणं फॅशन होतं, तसं आता लाबुबू डॉल्स दाखवणं पण एक ट्रेंड बनलंय!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मी कोणतेही नाटक केले नाही’; छळाच्या आरोपांनंतर तनुश्री दत्ताचे विधान










