Sunday, July 14, 2024

काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्याच्या जीवाला आहे धोका? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

टेलिव्हिजनवर अनेक मालिका येतात आणि जातात. मात्र काही मालिका अशा असतात ज्या कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. अशीच एक झी मराठीवरील एक मालिका म्हणजे ‘लागीर झालं जी’. आता ही मालिका बंद झाली असली तरी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर मोठी मोहिनी घातली. आज मालिका बंद होऊनही या मालिकेतील पात्र आणि मालिकेची कथा सर्वांना लक्ख आठवते. या मालिकेतील मुख्य जोडी आज्या उर्फ फौजी आणि शितली सर्वांच्याच मनात घर करून गेली. आजही प्रत्येकाला ही जोडी आठवते. मात्र आता अचानक या मालिकेबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या आज्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी प्रत्येकालाच बुचकळ्यात टाकणारी आहे.

आज्याने अर्थात नितीश चव्हाण याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. नितीशने त्याचा हातात एक पती असलेला फोटो पोस्ट केला असून, या पाटीवर लिहिले आहे की, “आम्ही पळून जाऊन लग्न केले…आमच्या जीवाला धोका आहे.” यासोबतच त्याने लिहिले आहे की, “मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशन बद्दल सांगितलं नाही कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय,मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं न्हवत पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय.”

नितीशचा हा फोटो आणि त्याची पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल झाली असून, त्याचे फॅन्स या पोस्टवर कमेंट्स करत त्याला धीर देत आहे, तर काहींनी याला त्याच्या आगामी प्रोजेक्टचा पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. त्याने त्याची ही पोस्ट अभिनेत्री मानसी भावलकरला टॅग केली आहे. म्हणजे नितीशने अभिनेत्री मानसीसोबत लग्न केलंय का? असा प्रश्न आता फॅन्स त्याला विचारत आहे. नितीशला ‘लागीर झालं जी’ मालिकेनंतर तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. नितीश एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट डान्सर असून, तो डान्स क्लास घेत असल्याचे सांगितले जाते. अभिनेत्री मानसी भावलकरने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अशीच पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा