लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि इंडियन प्रिमियर लीगचे पहिले चेअरमन ललित मोदी एकमेकांना डेट केल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. या बातमीने संपूर्ण सिने जगताला आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. सध्या त्यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मालदीवमध्ये दोघेही फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की,देशातील पहिली मिस युनिव्हर्स, बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चे माजी अध्यक्ष आणि आयुक्त ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. खुद्द ललित मोदींनी ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच सुष्मिता सेनचे त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ललित मोदींनी 7.44 वाजता पहिले ट्विट केले, ज्यामध्ये सुष्मिता सेनचे वर्णन ‘माय बेटर हाफ’ असे करण्यात आले होते. त्यानंतर दोघांचे लग्न झाल्याची चर्चा होती.
सुष्मिता सेन काही महिन्यांपूर्वी रोहमॉन शॉलसोबत डेटिंग करत होती. १५ वर्षांनी तरुण रोहमॉनसोबत तिचं रिलेशनशीप काही दिवसांपूर्वी संपुष्टात आलं. त्यानंतर सुष्मिताने चक्क ललित मोदीसोबत संसार थाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मालदीवमध्ये ट्रीप झाल्यानंतर लंडनला कुटुंबांसह परतलो आहे, माझी बेटर हाफ सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळायचा. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, अमाप आनंद होतोय, असं ट्वीट करताना ललितने अनेक प्रेमळ इमोजीही जोडल्या आहेत.
परंतु 42 मिनिटांनंतर, दुसर्या ट्विटमध्ये ललित मोदीने “मी हे स्पष्ट करू इच्छितो की अद्याप लग्न केलेले नाही, फक्त एकमेकांना डेट करत आहे. एक दिवस लग्नही करणार आहे.” रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता ललित मोदींना डेट करत आहे. खरं तर, सुष्मिता 3 वेळा रिलेशनशिपमध्ये होती, परंतु हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.