बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री ललिता पवार यांचे खरे नाव अंबिका होते. जेव्हा ललिता पवारांची आई गर्भवती होत्या, तेव्हा अंबा देवीच्या मंदिरात गेल्या होत्या, आणि तेथेच त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर मंदिराच्या बाहेर जन्म घेतल्याने त्यांचे नाव अंबिका ठेवले गेले. पण नंतर त्यांनी नंतर आपले नाव ललिता असे ठेवले, कारण त्यांना असे वाटले होते की, अंबिका हे नाव चित्रपटासाठी योग्य नाही.
मोठ्या आणि छोट्या अश्या दोन्हींही पडद्यावर त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आई आणि सासूच्या भूमिकेत ललिता पवार यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपली खास ओळख निर्माण केली. याशिवाय त्यांना प्रत्येक घरात रामायणांची ‘मंथरा’ म्हणूनही ओळखले जाते. ललिता पवार यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला.
ललिता पवार यांचे वडील लक्ष्मणराव शगुन हे नाशिकमधील श्रीमंत उद्योजक होते. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ललिता पवार यांनी प्रथम मूक चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटासाठी त्यांना १८ रुपये मानधन मिळाले होते. यानंतर त्यांनी प्रत्येक चित्रपटातून आपल्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण केली.
१९४२ मध्ये ललिता पवार यांच्यासमवेत ‘जंग-ए-आजादी’ चित्रपटाच्या चित्रीकरण्यादरम्यान असा अपघात झाला की, त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. ‘जंग-ए-आजादी’ चित्रपटात ललिता पवार ह्या अभिनेते भगवानदादा यांच्यासोबत थोबाडीत मारण्याच्या सीनचे शूटिंग करत होत्या. हे चित्रीकरण करत असताना देव दादा यांनी ललितांला इतक्या जोरात मारले की, त्या खाली पडल्या, आणि त्यांच्या कानापासून रक्तस्राव होऊ लागला. असे म्हणतात की, कानाच्या उपचार दरम्यान डॉक्टरांनी ललिता पवार यांना चुकीचे औषध दिले, त्यानंतर ललिता पवार यांच्या शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायू झाला.
ललिता पवार अर्धांगवायूमुळे बराच काळ करमणुकीच्या जगापासून दूर होत्या. त्यांचा डावा डोळा पूर्णपणे आकुंचन झाला होता, आणि त्यांचा चेहरा खराब झाला होता. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले ,पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आणि १९४८साली तब्येत सुधारल्यानंतर, ललिता पवार पुन्हा एकदा पडद्यावर परतल्या.
ललिता पवार यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. वास्तविक हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची सक्रियता सात दशके टिकली. यावेळी त्यांनी ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सात दशकांच्या या कारकीर्दीत त्यांनी सकारात्मक, नकारात्मक अशा सर्व प्रकारच्या पात्रांना जिवंत केले आहे. त्यांनी एक क्रूर सासू म्हणून इतके नाव कमावले की, आजही ललिता पवार यांचे नाव सासूची उपमा म्हणून घेतले जाते.
ललिता पवार यांचे वैयक्तिक जीवन पाहता त्यांनी गणपत राव यांच्याशी लग्न केले, पण गणपत राव यांच्याशी त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत. गणपत यांना सोडल्यानंतर ललिता यांनी निर्माता-दिग्दर्शक राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत ललिता पवार घरी एकट्याच होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- केजीएफ २ | १९ वर्षाच्या मुलाने केली ३०० कोटीच्या चित्रपटाची एडिट, टॅलेंट पाहून हैराण झाले लोक
- BIRTHDAY SPECIAL : ‘सीते’ची भूमिका साकारून देबिना बॅनर्जी बनली प्रेक्षकांची लाडकी, सौंदर्याने केले अनेकांना घायाळ
- BIRTHDAY SPECIAL :ललिता पवार यांना मंदिराबाहेरच दिला होता आईने जन्म, जाणून घ्या का काढावे लागले होते जात प्रमाणपत्र ?