Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘द वायर’, ‘फ्रिंज’, ‘जॉन विक’ आदी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारणाऱ्या हॉलिवूड अभिनेते असलेल्या लान्स रेडिक यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. १७ मार्च रोजी शुक्रवारी रेडिक यांचा नैसर्गिक मृत्यू झाला.

लान्स रेडिक यांच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. ‘द वायर’ सिनेमात लान्स रेडिक यांचे सहकलाकार असलेल्या वेंडेल पियर्स यांनी ट्विटरवरून लान्स रेडिक यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “लान्स जेवढे प्रतिभावान अभिनेता होते तेवढेच ते उत्तम संगीतकार देखील होते. आमच्या इंडस्ट्रीसाठी ही घटना अचानक आणि अनपेक्षित असून वेदनादायक आहे. त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी एक अकल्पनीय दुःख. गॉडस्पीड माझ्या मित्रा. तू इथे तुझा ठसा उमटवला आहे. RIP”

रेडिक यांना नेहमीच त्यांच्या करियरमध्ये सूट किंवा एखाद्या विशिष्ट युनिफॉर्ममधेच पाहिले गेले. याचे कारण म्हणजे त्यांनी बहुतकरून शांत आणि प्रतिष्ठित पुरुषांच्या भूमिका जास्त निभावल्या. रेडिक यांना एचबीओ ची सुपरहिट सिरीज असलेल्या ‘द वायर’मधील त्यांच्या लेफ्टनंट सेड्रिक डेनियल या भूमिकेसाठी ओळखले जाते. या सिरीजमध्ये त्यांनी बाल्टिमोर पोलीस विभागातील घाणेरड्या राजकारणात फसलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. रेडिक यांनी फॉक्स सिरीज ‘फ्रिंज’मध्ये देखील एका खास एजेंटची फिलिप ब्रॉयल्सची भूमिका साकारली होती. यासोबतच लायन्सगेट यांच्या ‘जॉन वीक’ चित्रपटांमध्ये मल्टी-स्किल्ड कॉन्टिनेंटल होटल कंसीयज कैरन ही भूमिका त्यांनी साकारली होती. या सिरीजचा चौथा सिनेमा याच महिन्यात शेवटी प्रदर्शित होणार आहे.

लान्स रेडिक यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच 20th सेंचुरी चा रिमेक असलेल्या ‘व्हाइट मेन कैन्ट जंप और शर्ली’ आणि नेटफ्लिक्सच्या शर्ली चिशोल्म यांच्या बायोपिकमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार होते.यासोबतच ते ‘जॉन विक’ यांच्या स्पिन ऑफ ‘बैलेरिना’ सोबत ‘द केन म्युटिनी कोर्ट-मार्शल’ मध्ये देखील काम करणार होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा