लोकप्रिय अभिनेत्री लारा दत्ता सध्या आपली नवी वेबसीरिज ‘हिक्कप्स अँड हुकअप्स’मुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजबाबत चाहत्यांमध्ये बरेच कुतुहल आहे. ‘हिक्कप्स ॲन्ड हुकअप्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मिडीयावर व्हायरल होते आहे. ‘हिक्कप्स अँड हुकअप्स’ भारतात नवा ओटीटी प्लेटफॉर्म लायन्सगेट प्ले (Lionsgate Play)वर प्रदर्शित होणार आहे.
वेबसीरिज ‘हिक्कप्स अँड हुकअप्स’चा ट्रेलर पाहून असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, लारा दत्ताने यात बोल्ड सीन्सही दिले आहेत. ही एक कॉमेडी फॅमिली ड्रामा वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये लारा दत्तासोबतच राजुकमार राव, प्रतीक बब्बर आणि शिनोवासोबतच अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. वेब सीरिजमध्ये दोन्ही कलाकारांचे एक आगळेच कुटुंब दिसेल, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच अजबगजब आहे.
आई-भाऊ आणि मुलीची कहाणी
‘हिकअप्स अँड हुकअप्स’ ही आई-भाऊ आणि मुलीची कथा आहे. या शोमध्ये लारा दत्ता एक गायिका आईच्या भूमिकेत आहे, तर प्रतीक बब्बर तिच्या भावाची भूमिका करत आहे. ‘हिकअप्स अँड हुकअप्स’मध्ये कौटुंबिक नातेसंबंध नव्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत, तर सिंगल मॉम्सच्या हुक अप्सवरही भर देण्यात आला आहे.
या कलाकारांसह दिव्या सेठ, नासर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी, म्यांग चेंग, मीरा चोप्रा आणि आयन जोया या सीरिजमध्ये दिसतील. वेबसीरिज ‘हिक्कप्स अँड हुकअप्स’चे दिग्दर्शन कुणाल कोहलीने केले आहे. ही वेबसीरिज 26 नोव्हेंबरला ‘लायन्सगेट प्ले’वर प्रदर्शित होईल.
‘लायन्सगेट प्ले’बाबत सांगायचे झाले, तर नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम व्हिडियो, डिज्नी+ हॉटस्टार जी5, एमएक्स प्लेयर, अल्ट बालाजीसारख्या डझनभर देशी-विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये आता ‘लायन्सगेट प्ले’ने एन्ट्री केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरच्या मनमोहक फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष, एक नजर टाकाच
-‘बिग बॉस’च्या घरामध्ये लग्न करण्यासाठी सारा खान अन् अली मर्चंटला मिळाले होते लाखो रुपये?
-पिझ्झा खाणारी ‘ही’ विचित्र महिला आहे बॉलिवूडची अभिनेत्री, नाव जाणून तुम्हीही व्हाल अचंबित