बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) सध्या तिच्या आगामी लायन्सगेट सीरिज ‘हिकअप्स अँड हुकअप्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिची चार वर्षांची मुलगी सायराबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या खुलाशांमध्ये लाराने सांगितले आहे की, घटस्फोट म्हणजे काय हे तिच्या मुलीला इतक्या लहान वयातच माहित होते. ‘फ्रेंड्स’ हा प्रसिद्ध शो पाहताना तिचा पती महेश भूपतीने सायराला घटस्फोटाचा अर्थ शिकवल्याचा खुलासाही लाराने केला. ‘फ्रेंड्स’ हा शो तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा आवडता शो आहे. लारा आणि महेश यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. २०१२ मध्ये दोघांनी मुलगी सायराचे स्वागत केले.
मुलीबद्दल ऐकून वाटले आश्चर्य
माध्यमांशी बोलताना लाराने खुलासा केला की, “महेशचा आवडता शो ‘फ्रेंड्स’ आहे आणि सायरा फक्त चार वर्षांची असल्यापासून ती तिच्या वडिलांसोबत शो पाहत होती.” लारा पुढे सांगते की, “एक दिवस सायरा माझ्याकडे आली आणि एक गेम खेळत असताना मला म्हणाली की, आई मी इथे राहते, हे माझे घर आहे. ते तुझे घर आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून मला जवळजवळ हृदयविकाराचा झटका आला. तिचे बोलणे ऐकून मी अवाक झाले आणि मी तिला विचारले, काय बोलतेयस? तुला हे कोणी सांगितले? घटस्फोट म्हणजे काय? तेव्हा ती मला म्हणाली, अग, जेव्हा दोन लोकांचे वैवाहिक जीवन वाईट असते आणि ते जुळत नाहीत, तेव्हा ते वेगळे राहू लागतात. याचा अर्थ त्यांचा घटस्फोट होतो. ती पाच वर्षांची होणार होती आणि तिच्या तोंडून या गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. मी माझ्या मुलीला विचारले की, तिला याबद्दल कोणी सांगितले आणि सायरा म्हणाली, डॅडीने.”
View this post on Instagram
महेश भूपतीला केला फोन
लारा पुढे सांगते की, तिने महेशला फोन करून मुलीच्या बोलण्याची पुष्टी केली आणि त्याला विचारले की, त्याने इतक्या लहान वयात या गोष्टी का सांगितल्या. यावर महेश हसला आणि म्हणाला, “आम्ही ‘फ्रेंड्स’ एकत्र पाहत होतो आणि सायराला जाणून घ्यायचे होते की, रॉसने तीन लग्न का केले?” लारा म्हणाली की, “म्हणून तू तिला सांगितलेस घटस्फोटाचा अर्थ काय? आपण असे पालक आहोत.”
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी