मीनाकुमारी (Meena Kumari) बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री. मीनाकुमारी यांनी अतिशय उत्तम चित्रपट बॉलिवूडला दिले. त्यांचा अभिनय, त्यांच्या अदा आदींमुळे आणि आरस्पानी सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या आठवणी आजही जीवंत आहे. लोकप्रियता, कलाविश्वात मानाचं स्थान आणि खासगी आयुष्यात आलेलं अपयश अशी मीना कुमारी कुमारी यांची ओळख. ‘ट्रेजेडी क्वीन’ किंवा ‘मल्लिका-ए-जज्बात’ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. सौंदर्याला कोणत्याही परिसीमा नसतात हे मीना कुमारी यांच्याकडे पाहून लगेचच लक्षात येते. मीनाकुमारी यांच्या चित्रपटांमधून, त्यांच्या अभिनयातून एवढा मोठा त्रास (दर्द) व्यक्त व्हायचा की बघणार्याला देखील ते जाणवायचे. मीनाकुमारी यांची गाणी देखील त्यांच्या दर्दला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. त्यात जर त्यांच्यासाठी जेष्ठ आणि दिग्गज अशा स्वर्गीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायली असतील तर सोने पे सुहागाच. आजही मीनाकुमारी यांची गाणी प्रत्येकालाच आणि प्रत्येकाच्या मनाला शांततेची जाणीव करून देतात. आज या लेखातून मीना कुमारी यांची अशी गाणी जाणून घेऊ जी लता मंगेशकर यांनी गायली आहेत.
अजीब दास्तां है ये :
हे ऑल टाईम हिट गाण्यांमधील एक गाणे आहे. प्रेमाला कधीच कोणी पूर्णपणे समजू शकत नाही. हीच गोष्ट या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळते. राज कुमार आणि मीनाकुमारी यांच्या ‘दिल अपना और प्रीत पराई’ सिनेमातील हे गाणे लता दीदींनी अतिशय सुंदर गायले असून, मीनाकुमारी यांनी उत्तम एक्सप्रेशन देऊन त्या गाण्याला एक उंची मिळवून दिली.
मौसम है आशिकाना :
‘पाकीज़ा’ सिनेमा कोणाला माहित नसेल असा एकही जणं शोधून सापडणार नाही. मीनाकुमारी यांच्या सर्वात सुंदर सिनेमांपैकी हा सिनेमा एक आहे. त्यांचा अभिनय, सौंदर्य आदी अनेक गोष्टींसाठी हा चित्रपट लक्षात राहतो. या सिनेमातील प्रत्येक गाणं तुफान गाजले. विशेष करून ‘मौसम है आशिकाना’ हे गाणे.
https://www.youtube.com/watch?v=PbNakvvryoE
थारे रहियो ओ बांके लाल :
‘पाकीज़ा’ सिनेमातील हे दुसरे गाणे तर कमाल आहे. लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चार चाँद लावले. या गाण्यावरील पाकिजा यांचे नृत्य देखील खूपच लोकप्रिय झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=rnsnOAQL7dY
रुक जा रात ठहर जा रे चंदा :
‘दिल एक मंदिर’ चित्रपटातील हे गाणे मीनाकुमारी आणि लता मंगेशकर यांच्या करिअरमधील सर्वात सुंदर गाणे म्हणून ओळखले जाते.
इन्हीं लोगों ने :
‘पाकिजा’ सिनेमातील सर्वच गाणी या दोघींच्याही करिअरमधील सर्वात सुंदर गाणी आहेत. या सिनेमातील कोणत्याही एका गाण्याची उत्तम गाणे म्हणून निवड होऊच शकत नाही.
हेही वाचा –
- ‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर
- ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात
- जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी
हेही पाहा-