Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड दिवंगत रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटावर लावले होते पैसे; फ्लॉप झाल्यानंतर घेतला बॉलीवूड मधून काढता पाय…

दिवंगत रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटावर लावले होते पैसे; फ्लॉप झाल्यानंतर घेतला बॉलीवूड मधून काढता पाय…

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांचेही बॉलिवूडशी खास नाते आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, या चित्रपटानंतर त्यांनी बॉलिवूडमधून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी कोणत्याही चित्रपटात पैसे गुंतवले नाहीत.

रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. रतन टाटा यांना करोडोंचे नुकसान झाले तेव्हा त्यांनी त्यानंतर कोणत्याही चित्रपटात पैसे गुंतवले नाहीत. 

अमिताभ बच्चन यांचा ऐतबार २००४ साली आला होता. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका संरक्षक वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फिअर या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. ऐतबारमध्ये बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ते

 एका वडिलांच्या भूमिकेत दिसला जो आपल्या मुलीला तिच्या विक्षिप्त आणि धोकादायक प्रियकरापासून वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जातो.खरं तर, लोकांना अमिताभ, बिपाशा आणि जॉनचा अभिनय आवडला पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी होते आणि केवळ 7.96 कोटी कमावले. चित्रपटाला त्याची किंमतही वसूल करता आली नाही.

या चित्रपटामुळे रतन टाटा यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ते इंडस्ट्रीपासून दुरावले.एकेकाळी रतन टाटा यांनीही चित्रपटांमध्ये हिंसाचाराची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते – मुंबईतील रेस्टॉरंटपेक्षा केचप चित्रपटांमध्ये जास्त दिसतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अक्षय कुमारने केला रिक्षा चालकाला भेटायचा प्रयत्न; मुंबईतील पहिल्या महिला रिक्षा चालक छाया मोहिते यांनी सांगितला किस्सा…

हे देखील वाचा