Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्ला-शहनाझ गिलचा ‘हॅबिट’ म्युझिक व्हिडिओ लवकरच होणार प्रदर्शित, ऑफ कॅमेरा फोटो व्हायरल

 

सिद्धार्थ शुक्ला आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचतच असतानाच अचानक त्याने या जगाचा निरोप घेतला. म्युझिक व्हिडीओ, डिजिटल माध्यम आदी अनेक ठिकाणी तो काम करत होता. याव्यतिरिक्त आगामी काळात त्याचे अनेक उत्तम प्रोजेक्ट येणार होते. सिद्धार्थ आणि त्याची लेडी लव्ह असणाऱ्या शहनाझ गिल यांनी दोन म्युझिक व्हिडिओ सोबत केले होते. दोन्ही व्हिडिओंमध्ये त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय हे दोघे श्रेया घोषालच्या ‘हॅबिट’ या गाण्याचाही भाग होते. हे गाणे अद्याप प्रदर्शित झाले नसले तरी ते गाजणार हे नक्कीच होते किंबहुना आहे.

https://www.instagram.com/p/CTZC3mAvPN9/?utm_source=ig_web_copy_link

‘हॅबिट’ हा म्युझिक व्हिडिओचे बीटीएस पिक्चर्स एका फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या दोघांचे फोटो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच चाहत्यांनीही हा ट्रॅक लवकरच प्रदर्शित करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या बीटीएस फोटोंमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये कँडिड पोझ देताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये सिद्धार्थ बसलेला असून तो हसताना दिसत आहे. एका फोटोमध्ये दोघेही सन बाथ घेताना दिसत आहेत. या सर्व फोटोंमध्ये शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची शानदार केमिस्ट्री पाहून चाहते भावुक झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CTXJcGQvCCy/?utm_source=ig_web_copy_link

‘हॅबिट’ म्युझिक व्हिडिओमध्ये सिडनाज एकमेकांच्या प्रेमात बुडलेले पाहायला मिळणार आहे. या दोघांची सुंदर जोडी पाहून चाहते दुःखी होत आहेत. फोटोग्राफरने त्याचे क्लिक केलेले फोटो शेअर करताच चाहत्यांनी गाणेही प्रदर्शित करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CTXHbKHDtTL/?utm_source=ig_web_copy_link

त्यांच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले की ‘हॅबिट’ गाणे प्रदर्शित करा, ‘प्लीज तुम्ही जितके शूट केले तितके प्रदर्शित करा … आम्ही सिड आणि नाज यांना शेवटचे एकत्र पाहू’ तर दुसऱ्याने लिहीले की ‘प्लीज हे गाणे प्रदर्शित करा.’ चाहते हे गाणे प्रदर्शित करण्याची विनंती करत आहेत. निर्मात्यांनी सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा