Saturday, June 21, 2025
Home टेलिव्हिजन ‘झांसी की रानी’ मालिकेतील छोटी मनू आठवते का? झालीये खूपच ग्लॅमरस

‘झांसी की रानी’ मालिकेतील छोटी मनू आठवते का? झालीये खूपच ग्लॅमरस

टेलिव्हिजनवरील ‘झांसी की रानी’ या शोने सगळ्या प्रेक्षकांना आकर्षित केले होते. या शोमधून अशी एक शूर कहाणी माहित झाली, जी कदाचित अनेकांना माहित देखील नसेल. या मालिकेतील कलाकारांनी खूप कष्ट केले होते. मनीकर्णिकाचे हे पात्र दोन अभिनेत्रींनी निभावले होतें छोट्या मनीकर्णिकाचे पात्र अल्का गुप्ता हिने निभावले होते. अनेकांना तिचा हा अंदाज खूप आवडला होता. मालिकेतील तिचे डॅशिंग पात्र अनेकांना आवडले होते. तिच्या या पात्राचे खूप कौतुक झाले. ही छोटीसी मनू आता खूप मोठी झाली आहे. तिचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.

सोशल मीडियावर अल्का गुप्ताचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तिला ओळखणे देखील कठीण होत आहे. तिचे चाहते कमेंट करून ती खूप बदलली आहे. हे देखील सांगत आहे. मालिकेत तिने झांसीची राणी हे मुख्य पात्र निभावले होते. या पात्राने तिने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

लवकरच ती स्टार प्लसवरील ‘बन्नी चाऊ होम डिलिव्हरी’ या मालिकेत दिसणार आहे. एवढेच नाही तर अल्का गुप्ता सोशल मीडियावर देखील तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोवर्स आहेत. ती अनेकवेळा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. चाहत्यांना देखील तिचा हा अंदाज खूप आवडतो. तसेच अनेकजण तिला नव्या भूमिकेत बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तिच्या मनू या पत्राने तिला भरभरून ओळख निर्माण केली.

हेही वाचा :

हे देखील वाचा