‘पार्टनर’मधील चिमुकला रोहन आठवतोय का? लेटेस्ट फोटो बघून घालाल तोंडात बोटं

गोविंदा (Govinda) आणि सलमान खानचा (Salman Khan) ‘पार्टनर’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सलमान खान आणि गोविंदाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. गोविंदा सलमानसोबत या चित्रपटात कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि लारा दत्ताही (Lara Dutta) होत्या. या चित्रपटात चारही कलाकारांनी जीव ओतला होता. पण या चित्रपटात एक लहान मुलगा रोहन देखील होता, जो चित्रपटात लारा दत्ताचा मुलगा दाखवला गेला होता. रोहन नसता तर चित्रपट अपूर्णच राहिला असता. या चित्रपटात रोहनची भूमिका अली हाजीने (Ali Haji) साकारली होती.

आज बदलून गेलाय पूर्ण लूक
अली हाजीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधला रोहन म्हणजेच अली हाजी ओळखणे खूप अवघड आहे. या फोटोमध्ये सलमानसोबत उभा असलेला अली आता सलमानपेक्षा मोठा दिसत आहे. रोहन म्हणजेच अलीचा ताजा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट केली की, हा मुलगा इतका मोठा झाला आहे यावर विश्वास बसत नाही.

View this post on Instagram

A post shared by Ali Haji (@iamalihaji)

मोठमोठ्या चित्रपटांचा भाग राहिलाय अली हाजी
अली हाजीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले, तर अलीने आपल्या करिअरची सुरुवात ‘फॅमिली’ चित्रपटातून केली. याशिवाय अलीने ‘फना’, ‘ता रा रम पम’, ‘राईट या रॉन्ग’, ‘पाठशाला’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे.

तसेच, अली सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. दरदिवशी तो त्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतो. इतकेच नव्हे, तर चाहतेही त्याच्या फोटोंना भरभरून प्रेम देतात.

Latest Post