Wednesday, June 26, 2024

‘अग्निपथ’नंतर पहिल्यांदाच करण मल्होत्राच्या ‘या’ चित्रपटात झळकणार अभिनेता संजय दत्त

‘शमशेरा’ हा सिनेमा या वर्षातील सगळ्यात प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. यासाठी प्रेक्षकही फार उत्सुक आहेत. संजय दत्त, रणबीर कपूर आणि वाणी कपूर या चित्रपटामध्ये प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. २२ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी सांगितले आहे की, २०१२ मधील चित्रपट ‘अग्नीपथ’, यातील संजय दत्तची भुमिका , ‘कांचा चीना’ या पात्रावरुन ते खूप प्रभावित झाले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

 

बहुदा यामुळेच शमशेरातील ‘जनरल शुद्ध सिंग’ या पात्रासाठी संजू बाबा यांचा विचार त्यांनी केला. अशाप्रकारे, संजय दत्त आणि करण मल्होत्रा अग्नीपथनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा