आपण प्रादेशिक, हिंदी, इंग्लिश आदी विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट बघतो. आजच्या सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या काळात कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा झाली की, लगेच मीडियाकडून त्या चित्रपटाची अ ते ज्ञ संपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जाते. नवीन सिनेमातील कलाकार, कथा यासोबतच तो सिनेमा कोणत्या चित्रपटाचा रिमेक आहे, सिक्वल आहे याची देखील माहिती मिळते. तसे पहिले तर चित्रपटांचे रिमेक होणे ही काही मनोरंजनविश्वासाठी नवीन बाब नाही. आजपर्यंत आपण असे अनेक सिनेमे ऐकले, पाहिले असतील ज्यांचे रिमेक झाले आहेत. आज रिमेक होणे खूपच नित्याची बाब झाली आहे. मात्र ही रिमेकची व्याख्या 90 चाय दशकातही मोठ्या प्रमाणावर यशस्वी होती. आज आम्ही तुम्हाला अशा एका मराठी सिनेमाबद्दल सांगणार आहोत जो एका हॉलीवूडपटाचा रिमेक आहे.
मराठीमध्ये अतिशय तुफान गाजलेला आणि सुपरडुपर हिट झालेला सिनेमा म्हणजे ‘झपाटलेला.’ महेश कोठारे दिग्दर्शित आणि लक्ष्मीकांत बेर्डे, पूजा पवार, किशोरी आंबिये अभिनित हा सिनेमा देखील एक रिमेक होता. हॉलिवूडमधील अतिशय गाजलेल्या ‘चाइल्डस प्ले’ या सिनेमाचा ‘झपाटलेला’ हा रिमेक होता. तीन पार्ट असलेल्या हा चाइल्डस प्ले सिनेमा 1988 साली प्रदर्शित झाला. महेश कोठारे यांनी त्यांच्या ‘झपाटलेला’ सिनेमाची संकल्पना याच सिनेमावरून घेतली.
‘झपाटलेला’ हे नुसते नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर तात्या विंचू, लक्ष्या, बाबा चमत्कार आदी पात्र येतात. महेश कोठारे यांचे सर्वच सिनेमे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करायचे. या सिनेमातले मुख्य पात्र होते म्हणजे तात्या विंचू नावाचा बाहुला. रामदास पाध्ये यांच्या मदतीने महेश कोठारे यांनी या सिनेमात तात्या विंचू साकारला. दिलीप प्रभावळकर यांचा दमदार आवाज या बाहुल्याला मिळाला आणि त्याची जादू प्रेक्षकांवर जी काय पसरली ती आजतागायत कायम आहे. पुढे या सिनेमाचा महेश कोठारे यांनी दुसरा भाग देखील काढला.
महत्त्वाच्या बातम्या-
–लता दीदींच्या वाढदिवशी रिलीझ झाले त्यांचे गाणे; तब्बल 22 वर्षांपूर्वी केले होते रेकॉर्ड
–‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माझ्या मोठ्या फॅन…’, सुकन्या मोनेंनी पोस्ट शेअर करत सांगितला ‘तो’ किस्सा