Saturday, June 29, 2024

सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री, जगाला हसणाऱ्या लक्ष्या मामांनी लग्नानंतर काही दिवसातच घेतला जगाचा निरोप

या ग्लॅमर दुनियेत येऊन आपलं नाव कमवावं आणि सगळ्यांनी आपल्याला ओळखावं अशी अनेकांची इच्छा असते. परंतु खरचं या झगमगत्या दुनियेत येऊन स्वतः तग धरून राहणे इतके सोप्पे असते का? या सृष्टीत येऊन नावारूपाला येणारे आणि शेवटपर्यंत टिकणारे कलाकार अगदी कमी आहेत. यातील एक मोठे नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे होय. ‘विनोदाचा बादशाह’, अशी ज्यांची ओळख होती, असे हे आपले सगळ्यांचे लाडके लक्ष्या मामा. आजही त्यांचा कोणताही सिनेमा लावून बसलो, तरीही तो कधी कंटाळवाणा वाटणार नाही आणि क्षणभर आपण हे विसरून ही जाऊ की, हा व्यक्ती आज आपल्यात नाही. एवढा जिवंतपणा त्यांच्या अभिनयात होता. मंगळवारी (२६ ऑक्टोबर) लक्ष्मीकांत बेर्डे यांची जयंती आहे. या निमित्त जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास…

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांना तीन भावंडे होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना बरेच कष्टाने दिवस काढायला लागले. शाळा आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक नाटक तसेच डान्समध्ये भाग घेतला होता तिथूनच त्यांच्यातील खरा कलाकार बाहेर आला. त्यांनी अनेक स्टेज शो केले आहेत. (Laxmikant berde’s birth anniversary let’s know about his life journey)

त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईमधील ‘मराठी साहित्य संघात’ सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांनी ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील अभिनयाचे सगळ्यांची भरभरून कौतुक केले होते. यानंतर त्यांना अनेक चित्रपटाच्या तसेच नाटकाच्या ऑफर येऊ लागल्या. त्यांनी त्यानंतर ‘आई तुझे उपकार’, ‘सत्वपरीक्षा’, ‘रंग प्रेमाचा’, ‘धूमधडाका’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘गडबड घोटाळा’, ‘धाकटी सून’, ‘कळतंय पण वळत नाही’, ‘खरे कधी बोलू नये’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘येडा की खुळा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यातील एक चित्रपट मात्र खूपच लक्षवेधी ठरला होता. तो म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटात त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती.

एवढंच नाही तर त्यांच्या अभिनयाची डंका अगदी बॉलिवूडपर्यंत गेला. त्यांनी सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या नंतर त्यांना बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात काम मिळाले. यानंतर त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘बेटा’, ‘दीदार’, ‘गीत’, ‘तकदीर’, ‘दिल की बाजी’, ‘फुल और अंगार’, ‘ब्रह्म’, ‘मासूम’ यांसारख्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. तसेच त्यांनी अनेक नाटकात काम करून देखील सर्वत्र प्रसिद्धी मिळवली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी १९९५ साली रुही बेर्डे यांच्याही लग्न केले होते. परंतु १९९८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी १९९८ मध्येच त्यांची सह-कलाकार प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केले. त्या दोघांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव स्वानंदी बेर्डे आणि मुलाचे नाव अभिनव बेर्डे आहे. त्यांच्या मुलाने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने ‘ती सध्या काय करते’ या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. प्रिया आणि लक्ष्या मामा यांचा पाहायला गेलं तर प्रेमविवाह होता. परंतु लग्न करताना त्यांना या गोष्टीची भनक देखील लागली नसेल की, ते अगदी काही दिवसाचे सोबती आहेत. त्यांना किडनीचा त्रास होता. परंतु कालांतराने हा आजार आणखीच वाढला आणि १६ डिसेंबर २००४ साली अभिनयातील एका राजाची प्राणज्योत मावळली. आपल्या धमाकेदार अभिनयाने सगळ्यांना खळखळून हसवणारे लक्ष्या मामा जाताना मात्र सगळ्यांना रडवून गेले.

आजही कित्येकांना या गोष्टीवर विश्वास ठेवायला जड जात आहे की, एवढा प्रतिभावान कलाकार आपल्यात नाही. पण म्हणतात ना, काळापुढे सगळ्यांना नतमस्तक व्हावे लागते आणि त्याच काळाआड जाऊन लक्ष्या मामांनी या जगाचा निरोप घेतला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा