Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा थांबायचं नाव घेत नाहीये ‘काली’ पोस्टरचा वाद, लीना मणिमेकलाईच्या पोस्टबाबत ट्विटरने उचललं मोठ्ठ पाऊल

थांबायचं नाव घेत नाहीये ‘काली’ पोस्टरचा वाद, लीना मणिमेकलाईच्या पोस्टबाबत ट्विटरने उचललं मोठ्ठ पाऊल

चित्रपट निर्माती लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) हिच्या ‘काली’ या माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर जनतेचा संताप चांगलाच भडकला आहे. सोशल मीडियापासून ते गल्लीबोळांपर्यंत सर्वजण या चित्रपटाला आणि लीना मणिमेकलाईच्या पोस्टरला कडाडून विरोध करत आहेत. दरम्यान, आता ट्विटरने या प्रकरणाची दखल घेत मोठे पाऊल उचलले आहे.  

लीना मनिमेकलाई यांची वादग्रस्त पोस्ट
खरं तर, २ जुलै रोजी, निर्माती लीना मणिमेकलाईने सोशल मीडियावर ‘काली’ या डॉक्यूमेंटरीचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये हिंदू देवी मॉं काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच कालीच्या पोस्टरमध्ये एलजीबीटी समुदायाच्या ध्वजही पाहायला मिळाला. लीना मणिमेकलाई यांच्या या पोस्टनंतर देशभरात वातावरण तापले. या अंतर्गत हिंदू समाजातील लोकांच्या श्रद्धेचा अपमान केल्याचा नवा वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, आता या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करत, सोशल मीडिया हँडल ट्विटरने लीना मनिमेकलाई यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ‘काली’चे पोस्टर पोस्ट पूर्णपणे काढून टाकले आहे.

लीना मनिमेकलाईच्या अटकेची मागणीने धरला जोर
‘काली’च्या या वादग्रस्त पोस्टरमुळे लीना मणिमेकलाईवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या शांत होण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, हिंदू संघटनांपासून ते सोशल मीडियापर्यंत लोक ‘काली’ डॉक्युमेंट्रीची निर्माती लीना मणिमेकलाईच्या अटकेची मागणी करत आहेत. यासोबतच लीना मणिमेकलाईच्यावर देशातील अनेक भागांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा