Tuesday, July 9, 2024

बाबिलने वडील इरफानच्या फार्महाऊसवर केले पहिले फोटोशूट, चाहत्यांना आली दिवंगत अभिनेत्याची आठवण

आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाहीये. मात्र, आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत बाबिल खान लवकरच अभिनेता म्हणून बॉलिवूडमधील आपला नवीन प्रवास सुरू करण्यास सज्ज झाला आहे. मात्र, बाबिलला मोठ्या पडद्यावर पाहण्यापूर्वीच त्याच्या सोशल मीडियावरील फोटोशूटने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नुकतेच बाबिलने आपले पहिले फोटोशूट केले. त्याच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्याला लोकांकडून जोरदार पसंती मिळत आहे. बाबिलचे हे फोटोशूट पाहून चाहत्यांच्या मनात इरफान खानच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

नाशिकच्या फार्महाऊसवर केले फोटोशूट
बाबिलचे पहिले फोटोशूट त्याच्यासाठी खूप खास आहे. कारण, त्याने हे फोटोशूट नाशिक येथील त्याच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर केले आहे. या फोटोंमध्ये बाबिल अतिशय सुंदर दिसत आहे आणि तो निश्चितच त्याचे वडील इरफान खान यांची फोटोंमध्ये झलक दाखवत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी सेन यांनी बाबिलचे अनेक मूड आपल्या कॅमेऱ्यात सुंदरपणे टिपले आहेत. ईशा भन्साळीने बाबिलची स्टाईल केली आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Legendary Actor Irrfan Khan Son Babil First Photoshoot On His Father Farmhouse In Nashik)

बाबिलने फार्महाऊसला म्हटले खास
आपल्या पहिल्या फोटोशूटबद्दल बोलताना बाबिलने ते स्वतःसाठी खूप खास असल्याचे सांगितले. बाबिल म्हणाला, “हे फार्महाऊस माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आहे. जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांना विश्रांतीची आवश्यकता असायची, तेव्हा ते येथे विश्रांती घेण्यासाठी येत असत. मला या ठिकाणी त्यांची उपस्थिती जाणवू शकते, म्हणून मी माझ्या फोटोशूटसाठीही ही जागा निवडली आहे. शिवाजी सेनने माझे सर्व मूड सुंदरपणे टिपले.”

शूटपूर्वी केली चर्चा
“मला कोणत्या प्रकारची चित्रे हवी आहेत, याबद्दल शूटपूर्वी आमच्यात बरीच चर्चा झाली आणि मला वाटते की, आम्ही जे करण्याचा विचार केला, तितकाच परिणाम चांगला आहे,” असे पुढे बोलताना बाबिल म्हणाला.

बाबिलने अद्याप त्याच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. बाबिलला वडील इरफानकडून अभिनयाचा एक मजबूत वारसा लाभला आहे.

बाबिलच्या चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा