Saturday, July 6, 2024

धक्कादायक! राहत्या घरी गुदमरून ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, जगभरातील चाहते शोकसागरात

गेल्या काही महिन्यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दुर्दैवी अनेक घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांत दोन मल्याळम अभिनेत्रींचे निधन झाले. मल्याळम अभिनेत्री डॉ. प्रिया आणि रेंजुषा मेनन यांच्या आकस्मिक निधनानंतर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. चेन्नईतील वलासरवक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी दिग्गज तमिळ अभिनेते रघु बलैया उर्फ ज्युनियर बलैया यांचा गुरूवारी, 2 नोव्हेंबरला पहाटे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

माध्यमातील वृत्तानुसार, चेन्नईमधील वलासरवक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी ज्युनिअर बलैया (Raghu Balaiah)  यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्युनियर बलैया यांच्या अंत्यसंस्काराची अधिक माहिती अद्याप उपलब्ध नाही. 28 जून 1953 रोजी जन्मलेल्या ज्युनियर बलैयाने चित्रपटांपूर्वी काही नाटकांमध्ये काम केले होते.रघु बलैया हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते टीएस बलैया यांचे पुत्र होते. त्यांना प्रेमाने ज्युनियर बलैया असं म्हटलं जायचं. त्यांनी 1975मध्ये ‘मेलनाट्टू मारुमगल’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

त्यांनी चार दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत काम केले. या काळात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘करागतकरण’, ‘सुंदरा कंदम’, ‘विनर’, ‘साताई’, ‘चिट्ठी’, ‘वळकई’ व ‘चिन्ना पापा पेरिया पापा’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 2021 मध्ये आलेला ‘नेरकंडा परवई’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. या सिनेमात अभिनेता अजित या मुख्य भूमिकेत होता.

 ज्युनियर बलैया यांनी अनेक विविध भूमिका साकारल्या. त्यांनी खलनायक, कॉमेडी आणि नाटक यासारख्या विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांनी आपल्या अभिनयाने तमिळ सिनेसृष्टीत एक अविस्मरणीय छाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रघु बलैया यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या निधनाने तमिळ सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. (Legendary actor of southern cinema Raghu Balaiah dies at 70 after suffocation at his residence)

आधिक वाचा-
शाहरुख खानने होळीच्या मुहूर्तावर केले होते दिव्या भारतीला प्रपोज, वाचा तो किस्सा
वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

हे देखील वाचा