हिंदी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे आज (२३ ऑक्टोबर) सकाळी निधन झालं आहे. त्यांनी कॅनडामध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा भाऊ अनवर अली यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी मीनू यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल चित्रपट बंधू, प्रेस, मीडिया, चाहते, मित्रांचे आभार मानले आहेत.
मीनू मुमताज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार मेहमूद यांच्या बहीण होत्या. मीनू यांचा जन्म २६ एप्रिल १९४२ रोजी झाला. त्यांनी लहानपणापासूनच नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. मेहमूद यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांशी जोडले गेले होते, त्यामुळे मीनूही चित्रपटांमध्ये आल्या. देविका राणी यांनी त्यांना चित्रपटांमध्ये ब्रेक दिला होता. देविका राणी यांनी ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये मीनूला डान्सर म्हणून कामावर घेतले. (legendary actress minoo mumtaz passed away)
मीनू यांनीे ‘घर घर में दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी गावात राहणाऱ्या एका डान्सरची भूमिका साकारली होती. मात्र मीनू यांना या चित्रपटातून फारसे यश मिळाले नव्हते.
‘सखी हातिम’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. यामध्ये त्यांनी जलपरीची भूमिका साकारली होती. १९५८ मध्ये आलेल्या ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात त्यांनी त्यांचा भाऊ मेहमूदसोबत पडद्यावर रोमान्स केला होता. पडद्यावर भाऊ-बहिणीचा रोमान्स पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले होते आणि त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.
मीनू यांची जोडी सर्वात जास्त कॉमेडियन जॉनी वॉकरसोबत जमली होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मीनू यांनी पडद्यावर कॉमेडी आणि सहाय्यक भूमिकेनेही खूप वाहवा मिळवली.
त्यांनी १९६३ मध्ये दिग्दर्शक सय्यद अली अकबर यांच्याशी लग्न केले. जेव्हा मीनू मुमताजची तब्येत बिघडली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ट्युमर असल्याचे सांगितले होते. पण ऑपरेशन केल्यावर त्या बऱ्या झाल्या होत्या. यानंतर त्या कॅनडामध्ये राहू लागल्या. मात्र शनिवारी सकाळी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खूपच सुंदर! परी बनून अक्षया देवधरने चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, एक नजर टाकाच
-आजही कायम आहे किशोरी शहाणेंचं सदाबहार सौंदर्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’
-स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; श्रियाच्या स्टाईलनेे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष










